Twitter | Representational Image (Photo Credits: Pixabay)

भारतीय कंप्युटर इमरजेंसी रिस्पॉन्स टीम (CERT-IN) ने युजर्सला आपल्या ट्विटर अकाउंटला सिक्युर करण्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत. त्यानुसार नुकत्याच फसवणूकदारांकडून काही ट्विटवरील अकाउंट्स हॅक करण्यात आले आहेत. त्यामध्ये खुप फॉलोअर्स असणाऱ्यांचा समावेश आहे. या ट्विटर अकाउंटवरील संवेदनशील माहितीसह फेक लिंकच्या घटना घडल्या आहेत. अशातच सीईआरटी-इन यांनी ट्विटर अकाउंट कसे सुरक्षित ठेवावे याबद्दल अधिक सविस्तर पद्धतीने सांगितले आहे.

ट्विटर युजरसने प्रथम मोठा आणि मजबूत पासवर्ड ठेवाव. ज्यामध्ये अपरकेस, लोअरकेस, क्रमांक किंवा चिन्हांचा समावेश असेल. हा पासवर्ड दुसऱ्या ठिकाणी वापरु नका आणि फोन क्रमांक, जन्म तारीख असे सामान्य शब्दांपासून पासवर्ड तयार करु नका.(महत्वाची बातमी! मोबाईल युजर्सने लवकरात लवकर करा हे काम अन्यथा  सिम कार्ड होईल बंद)

टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन ट्विटर अकाउंटला एक्स्ट्रा लेअर सुरक्षितता मिळते. लॉगिन इंन्फॉर्मेशनला सिक्युर करण्यासाठी पासवर्ड मॅनेजमेंट ऑथेंटिकेशन सिक्युरिटाला वाढवण्यासाठी पासवर्ड व्यतिरिक्त एक सिक्युरिटी कोड किंवा सिक्युरीटी की चा वापर करावा.  ट्विटर युजरने हॅकिंगच्या प्रकाराला बळी पडू नये म्हणून फेक लिंकवर क्लिक करण्यापासून दूर रहावे. त्याचसोबत ट्विटरवर पर्सनल मेसेज ट्विटर रिप्लाय, इमेल आणि डीएम करुन आलेल्या फेक लिंक सुद्धा उघडून पाहू नका.

कोणालाही तुमचा युजर आयडी किंवा ट्विटरचा पासवर्ड कधीच शेअर किंवा सांगू नका. असे करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरु शकते. या व्यतिरिक्त फॉलोअर्स वाढवण्यासाठी काही जणांकडून मेसेज केले जातात. परंतु अशा गोष्टींचा सुद्धा बळी पडू नका. ट्विटर अकाउंटच्या सुरक्षिततेबद्दल आणखी महत्वाचे म्हणजे जेव्हा तुम्ही अकाउंट एखाद्या दुसऱ्या डिवाइसवर वापर असाल तर तुम्हाला अलर्ट मेसेज दाखवला जातो. असा मेसेज आल्यास तुम्ही ती गोष्ट करत नसाल तर लगेच ट्विटर अकाउंट संबंधित ईमेल अॅड्रेस बदला. थर्ड पार्टी अॅपच्या माध्यमातून ट्विटवर लॉग-इन किंवा लॉग-आउट करण्यापासून दूर करा. कारण अशा प्रकारे अॅप तुमच्या हालचालींवर लक्ष ठेवून असते.