TRAI | FB

Telecom Regulatory Authority of India कडून गुरूवार (20 जुलै) दिवशी एक प्रस्ताव निर्माण करण्यात आला आहे ज्यामध्ये artificial intelligence (AI) चा वापर आणि विकास जबाबदारीने करण्याच्या सूचना दिल्या आहे. यासाठी 10 पानी रिपोर्ट बनवण्यात आला आहे. त्यांच्या अहवालामध्ये विशिष्ट AI चा वापर हा विचारपूर्वक करण्याची गरज आहे. प्रामुख्याने अशा गोष्टींमध्ये ज्यात मानवी आयुष्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

TRAI च्या प्रस्तावानुसार, Artificial Intelligence and Data Authority of India( AIDAI)ची स्थापना करण्याची गरज आहे. ही संस्था regulator आणि recommendatory body म्हणूनही ही दोन्ही स्वरूपात काम करेल.  AI शी निगडीत डोमेन मध्ये ती अ‍ॅडव्हायझरी रोल करेल. Ministry of Electronics and Information Technology ने AI ची administrative ministry देखील असावं असा प्रस्ताव TRAI ने दिला आहे.

AI ची भूमिका ही टेलिकॉम सेक्टर पुरती मर्यादित नाही. त्याचा प्रभाव आरोग्य, ट्रान्सपोर्टटेशन, वित्त, शिक्षण, कृषी क्षेत्रामध्येही पडू शकतो. त्यामुळे केवळ टेलिकॉम पुरते त्याला न पाहण्याचा सल्ला अहवालात देण्यात आला आहे. नक्की वाचा: What is Artificial Intelligence: आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजे काय? त्याचा कुठे होतो वापर .

टेलिकम्युनिकेशन विभागाकडून 2020 साली रेग्युलेटर बाबत विचारणा केली होती परंतू TRAI ने तेव्हा AI technology ही विकसनशील आहे त्यामुळे त्याच्या सार्‍या बाजूंचा विचार करण्यासाठी वेळ लागेल. असे सांगण्यात आले होते.

AIDAI भविष्यातील सर्व तंत्रज्ञान आणि AI मॉडेल्सवर नाविन्यपूर्ण आर्किटेक्चर्सचा स्वीकार करण्यास सुलभ करेल आणि सर्व AI मॉडल्स आणि उपायांची चाचणी आणि मान्यता यासाठी विविध प्रयोगशाळांच्या मान्यता आणि शिफारशींसाठी दूरसंचार अभियांत्रिकी केंद्रासारख्या सरकारच्या तांत्रिक testing and accreditation संस्थांशी समन्वय साधेल. ही सर्वोच्च संस्था डाटा डिजिटलायझेशन, शेअरिंग आणि मॉनिटायझेशन याबाबत पॉलिसी बनवण्याचं आणि त्याच्या वापराबद्दल माहिती देण्याचं काम करणार आहे.

TRAI ने AIDAI ला AI governance मॉडेल बनवण्याच्या सूचना केल्या आहे. यामध्ये प्रत्येक क्षेत्रासाठी आणि पब्लिक साठी त्याचा वापर कसा केला जाऊ शकतो यासाठी तत्त्व देखील बनवली जातील. ग्राहकांचे प्रोटेक्शन करण्यासोबतच या सेक्टर मधील वाढ देखील त्यांच्याकडून पाहिली जावी यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत.