तुमचा सोशल मीडियावरील पासवर्ड सुरक्षित आहे का? 'या' पद्धतीने तपासा
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

गेल्या काही काळापासून देशभरातील युजर्सचे सोशल मीडियावरील अकाउंट हॅक होत असल्याचे प्रकार घडत आहेत. तर फेसबुक वरील डेटा लीक झाल्यानंतर अन्य काही रिपोर्ट्सुद्धा लीक झाल्याची बाब समोर आली आहे. लीक झालेल्या माहितीमध्ये युजर्सचे नाव आणि पासवर्ड दाखवला जात आहे. त्याचसोबत युजर्सची सोशल मीडियावरील वैयक्तिक माहितीसुद्धा हॅकर्सला पटकन कळून येत आहे. त्यामुळे सध्या इंटरनेटच्या अधिकाधिक वापरामुळे बहुतांश गोष्टींचे व्यवहार किंवा कामे ऑनलाईन पद्धतीने केली जातात. अशा परिस्थितीत युजर्सचा पासवर्ड सुरक्षित असणे फार महत्वाचे असते.

काही वेळेस मोबाईलवर एक लिंक आल्याने ती आपण सुरु करतो. परंतु अशा फेक लिंकवर क्लिक केल्याने काही जणांची फसवणूक झाल्याचे प्रकारसुद्ध उघडकीस आले आहेत. मात्र जर तुम्हाला सोशल मीडियावरील तुमच्या अकाउंटचा पासवर्ड सुरक्षित आहे की नाही हे तपसाण्यासाठी 'या' सोप्या पद्धतीचा वापर करा.(Wifi चा स्पीड वाढवण्यासाठी वापरा 'या' सोप्या ट्रिक्स)

>सर्वात प्रथम गुगल क्रोम सुरु करा.

>त्यानंतर क्रोम स्टोर सुरु करुन पासवर्ड चेकअप सर्च करा.

>पासवर्ड चेकअप इन्स्टॉल केल्यावर अॅड टू क्रोमवर क्लिक करा.

पासवर्ड चेकअप टूल अटोमॅटिक काम करण्यास सुरुवात करते. म्हणजेच तुम्ही जेव्हा सोशल मीडियावरील एखादे अकाउंट लॉगिन करता, तेव्हा तुम्हाला पासवर्ड मॉनिटरिंग केले जाते. त्यामुळे या पद्धतीचा वापर केल्यास ज्यावेळेस तुमचा पासवर्ड लीक होत असल्यास तुम्हाला त्यानुसार वॉर्निंग दिली जाईल. तसेच तुम्हाला वॉर्निंग पॉपसह पासवर्ड बदलण्यासाठी वारंवार सुचना दिली जाईल.