Wifi चा स्पीड वाढवण्यासाठी वापरा 'या' सोप्या ट्रिक्स
WiFi (Representational Image)

सध्या जगात इंटरनेटचा वापर फार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच विविध कंपन्या इंटरनेटची सुविधा ग्राहकांच्या खिशाला परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध करुन देतात. मात्र काही वेळेस इंटरनेटचा सातत्याने वापर केल्याने त्याचा स्पीड थोडा कमी झाल्याचे दिसून येते.

त्यामुळे इंटरनेटच्या अभावी आपले काम अडून राहते. तसेच व्यक्तीची चिडचिड होण्यासाठी सुरुवात होते. अशा वेळी जर तुम्हाला Wifi चा स्पीड वाढवायचा असल्यास या सोप्या ट्रिक्सचा वापर करा.

>काही स्मार्टअ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही वायफायचा स्पीड किती आहे ते पाहू शकता. तर क्लाऊड चेक नावाचे अ‍ॅप तुम्ही वापरत असल्यास त्यावरुन तुम्हाला वायफायच्या स्पीडची माहिती मिळू शकते.

>वायफायचे राऊटर मोकळ्या जागेत ठेवा. त्याचसोबत इलेक्ट्रिक वस्तूंपासून सुरु ठेवण्याचा प्रयत्न करा.

>Wireless-N (802.11) या सारख्या नव्या आणि वेगवान टेक्नॉलॉजीचा वापर करा. त्यामुळे तुमच्या वायफायचा वेग अधिक वाढेल.

>राऊटरच्या चॅलनमध्ये बदल करा. कारण काही वेळेस एकाच राऊटरच्या माध्यमातून त्यावर एकापेक्षा अधिक उपकरण कनेक्टेड असल्यास त्यावर ताण येतो.

(पाकिस्तान मधून व्हॉट्सअ‍ॅपवर येणाऱ्या 'या' क्रमांकावरील फोन उचलू नका, नाहीतर व्हाल कंगाल)

तर वरील सोप्या ट्रि्क्स लक्षात ठेवून तुम्ही वायफायचा स्पीड वाढवू शकता. तसेच बाजार सध्या नवीन तंत्रज्ञान पद्धतीचे वायफाय विक्रिसाठी आले आहेत.