पाकिस्तान मधून WhatsApp वर येणाऱ्या 'या' क्रमांकावरील फोन उचलू नका, नाहीतर व्हाल कंगाल
WhatsApp प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

सध्या पाकिस्तान (Pakistan) येथून काही नागरिकांना व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) एका क्रमांकावरुन फोन येत आहे. त्या क्रमांकावरील फोन उचल्यावर तुम्ही करोडपती झालात असे सांगितले जाते. मात्र खरी गोष्ट अशी आहे की, या क्रमांकावरुन येणारा फोन फेक असून तुम्ही तो उचललात तर तुमची मोठी फसवणुक होऊ शकते.

देशातील नागरिकांना 923055216117 या क्रमांकावरुन व्हॉट्सअ‍ॅप फोन येत आहेत. परंतु 92 हा पाकिस्तानचा कोड क्रमांक असून यावरुन बोलणारी व्यक्ती तुम्ही 25 लाख रुपये जिंकले असल्याचे आमिष दाखवते. तर जिंकलेले पैसे मिळण्यासाठी हा क्रमांक तुमच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करा अशी सुचना दिली जाते. त्याचसोबत कौन बनेगा करोडपती या शोचा एक व्हिडिओसुद्धा पाठवला जातो.

(WhatsApp ने सादर केले 'हे' भन्नाट फीचर; चुकीच्या व्यक्तिला पाठवला जाणार नाही मेसेज अथवा फोटो)

मात्र सायबर तज्ञांनी या क्रमांकावरील फोन न उचलण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे. नाहीतर तुम्ही कंगाल व्हाल असा इशारासुद्धा देण्यात आला आहे. आर्थिक फसवणुकीला बळी पडू नये यासाठी अशा कोणत्याही क्रमांकावरुन फोन आल्यास त्यावर पुन्हा कॉल करु नका असे सुद्धा सांगण्यात आले आहे.