WhatsApp ने सादर केले 'हे' भन्नाट फीचर; चुकीच्या व्यक्तिला पाठवला जाणार नाही मेसेज अथवा फोटो

आता या फीचरमुळे तुम्हाला कोणासमोरही शरमेने मान खाली घालावी लागणार नाही. mspoweruser.com च्या एका अहवालानुसार, कंपनीने आपले नवीन फीचर बीटा वर्जन 2.19.173 मध्ये रोलआउट केले आहे.

WhatsApp ने सादर केले 'हे' भन्नाट फीचर; चुकीच्या व्यक्तिला पाठवला जाणार नाही मेसेज अथवा फोटो
WhatsApp/Photo Credits: Pixabay

व्हाट्सअॅप (WhatsApp) आपल्या वापरकर्त्यांना नवनवीन अनुभव देण्यासाठी सतत नवीन फीचर्स सादर (New Feature) करत असते. यावेळी लोकाग्रहास्तव एक नवीन फीचर सादर केले आहे. या फीचरमुळे आता आपणाकडून कोणालाही चुकीचा संदेश आणि फोटो पाठवला जाऊ शकणार नाही. आता या फीचरमुळे तुम्हाला कोणासमोरही शरमेने मान खाली घालावी लागणार नाही. mspoweruser.com च्या एका अहवालानुसार, कंपनीने आपले नवीन फीचर बीटा वर्जन 2.19.173 मध्ये रोलआउट केले आहे.

बरेचवेळा आपण घाई घाई एकाचा मेसेज दुसऱ्याला पाठवतो. एका व्यक्तिला फोटो पाठवायचा असेल तर कधी कधी तो दुसऱ्याला पोहचतो अशा वेळी आपणाला अक्षरशः शरमेने मान खाली घालायला लागते. हीच गोष्ट टाळण्यासाठी व्हाट्सअॅपने हे नवीन फीचर सादर केले आहे. आता यापुढे व्हाट्सअॅपवर कोणताही मेसेज अथवा फोटो पाठवण्याधी तुम्हाला टॉप लेफ्ट कॉर्नर मध्ये त्या व्यक्तीचा प्रोफाइल फोटो दिसेल, तसेच कॅप्शन एरियाचे खाली त्या व्यक्तीचे नाव लिहिलेले दिसेल. यामुळे चुकीच्या व्यक्तिला मेसेज अथवा फोटो जाण्याची शक्यता फार कमी होणार आहे.

(हेही वाचा: आताच काढून ठेवा, Whatsapp स्क्रिन शॉट घेणे लवकरच होणार बंद!)

सध्या हे फीचर बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. लवकरच त्याचे स्टेबल व्हर्जनदेखील सादर केले जाणार आहे. सध्या हे फक्त अँड्रॉइड फोनमध्येच उपलब्ध होणार आहे. दरम्यान, याआधी व्हाट्सअॅप आपल्या अनेक फीचर्सवर काम करत असल्याची माहिती मिळाली होती. यात डार्क मोड, ऑथेंटिकेशन फीचर आणि पीआयपी मोड यांचा समावेश होता. व्हाट्सअॅप आता यातील काही फीचर्स आपल्या अँड्रॉइड फोनमध्ये रोल-आउट करत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 19, 2019 12:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).