स्मार्टफोन विश्वातील जगप्रसिद्ध मॅसेंजर अॅप Whatsapp लवकरच एक नवा बदल घेऊन येत आहे. जो बदल युजर्सला Whatsapp स्क्रिनशॉट काढण्यास प्रतिबंद करेन. थेटच सांगायचे तर Whatsapp Screenshot काढता येणे लवकरच बंद होणार आहे. Whatsapp चा मालकी हक्क असलेली कंपनी व्हॉट्सअॅप स्क्रिनशॉट काढण्याला प्रतिबंद घालण्याबाबत विचार करत आहे.हे Whatsapp चा हा विचार जवळपास पक्का झाला असून, सध्या त्याबाबतची चाचणी सुरु असल्याची माहिती आहे.
Whatsapp बाबत अद्यावत माहिती ठेवणाऱ्या WABetaInfo च्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की, Whatsapp सध्या एका नव्या बदलाचे परिक्षण करत आहे. जे वापरकर्त्याला Whatsapp चा स्क्रिनशॉट काढण्यास मज्जाव करेन. हा बदल अँड्रॉइड यूजर्स आणि ऑथेन्टिकेशन सेवेसोबत येण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, व्हॉट्सअॅपचं 'Vacation Mode' आता 'Ignore Archived Chats'म्हणून येणार? बीटा व्हर्जनवर झलक)
WABetaInfo ट्विट
When the Authentication feature will be available and you enable it, conversation screenshots are blocked (for you) 😢
What do you think? I don't like the idea and I don't see the point.
If I authenticate my identity using my fingerprint, why conversation screenshots are blocked? https://t.co/wVFWyx2Ibb
— WABetaInfo (@WABetaInfo) April 15, 2019
युजर्सची अत्यंत गुप्त, संवेदनशील माहिती, दोन व्यक्तिंमधील खासगी संभाषण कोणा इतर व्यक्तीपर्यंत पोहचण्यापासून युजर्सचा बचाव करण्यासाठी Whatsapp हे पाऊल उचलत आहे. जेणेकरुन Whatsapp वापरकर्त्याची खासगी माहिती लीक होणार नाही. तसेच, नागरिकांच्या गोपनियतेच्या विश्वासालाही तडा जाणार नाही. Whatsapp स्क्रिन शॉट काढणे आणि ते इतरांपर्यंत पोहोचवणे ही आता एक सामान्य बाब झाली आहे.