WhatsApp News | (Photo credit: archived, edited, representative image)

तेलुगु देसम पक्षाचे राज्यसभा खासदार सीएम रमेश (TDP MP CM Ramesh) यांनी स्वत: माहिती देत दावा केला आहे की, व्हॉट्सअपने (WhatsApp) त्यांचे अकाऊंट बंद केले आहे. सीएम रमेश यांनी माहिती देताना सांगितले की, माझ्या WhatsApp अकाऊंटवर मला कोणाचाही मेसेज येत नाही. तसेच,मीसुद्धा माझ्या WhatsApp अकाऊंटवरुनही कोणताही मेसेज कोणालाही पाठवू शकत नाही. त्यामुळे आता प्रश्न असा निर्माण होतो की, WhatsApp जर लोकप्रतिनिधी असलेल्या एका खासदाराचे Whatsapp Account बंद करु शकत असेल तर, सर्वसामान्य व्यक्तिबाबत WhatsApp चे वर्तन कसे असेल. दरम्यान, असे असले तरी, सी एम रमेश यांचे WhatsApp अकाऊंट बंद का झाले याबाबतही प्रसारमाध्यमांनी वृत्त दिले आहे.

सी एम रमेश यांच्या WhatsApp अकाऊंट बद होण्याबाबत प्रसारमाध्यमांनी दिलेल्य वृत्तात म्हटले आहे की, सीएम रमेश यांच्या WhatsApp अकाऊंटबाबत अनेक लोकांनी WhatsApp कडे तक्रार केली होती. दरम्यान, ही तक्रार नेमकी कोणत्या मुद्द्यावर केली होती याची माहिती मिळू शकली नाही. पण, तुम्ही काळजी घ्या अन्यथा तुमचेही अकाऊंट WhatsApp बंद करु शकते. (हेही वाचा, WhatsApp Updet: बीटा व्हर्जनसाठी व्हॉट्सअपचे नवे डिझाईन तयार, तुम्ही पाहिले का?)

दरम्यान, WhatsApp बाबत ताजी माहिती अशी की युजर्स मंडीळी आता सावध राहा. WhatsApp युजर्सचे अकाऊंट डिलीट करतो आहे. तुम्हीही वेळीच काळजी घेतली नाही तर, तुमचेही WhatsApp अकाऊंट डिलीट होऊ शकते. प्राप्त माहितीनुसार WhatsApp प्रतिदिन सुमारे 20 लाख Fake WhatsApp Accounts डिलीट केली आहेत. आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की, व्हॉट्सअपने अचानक हे पाऊल का उचलले. या प्रश्नाचे उत्तर असे की, व्हॉट्सअपच्या माध्यमातून पसरवल्य जाणाऱ्या फेक न्यूजना आळा घालण्यासाठी फेसबुक हे पाऊल उचलत आहे. त्यामुळे तुम्हीही फेक न्यूज पसरवरत असाल तर, वेळीच सावध व्हा अन्यथा तुमचेही WhatsApp अकाऊंट डिलीट होऊ शकते.