WhatsApp युजर्ससाठी एक महत्त्वाची बातमी आहे. WhatsApp ने आपल्या नव्या ऑथेंटिकेशन फिचरनंतर आता आपल्या अॅपमध्येही काही महत्त्वाचे बदल केले आहेत. WaBetaInfo ने केलेल्या ट्विटनुसार व्हॉट्सअपने आपल्या बीटा व्हर्जनसाठी नवे डिझाईन उपलब्ध केले आहे. या रीडिजाइन अपडेटमुळे व्हॉट्सअपच्या Setting ऑप्शनचा लूक आणि लेआऊट बदलला जाईल. ट्वीटद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या फोटोनुसार पहिल्यांदा युजर्सला Settings मध्ये Account, Chats, Notification, Payments, Data & Storage, Invite a friend आणि त्यानंतर Help असा ऑप्शन दिलेल. डिझाईन बदलल्यानंतर व्हॉट्सअपमध्ये एक सिक्वेन्सही बदललेला पाहायला मिळेल.
नव्या डिझाईनमध्ये दिलेल्या ऑप्शनमध्ये त्याचा सिम्बॉलही तयार करण्यात आला आहे. याशिवाय Chats खाली Wallpaper, Chat Backup, Chat History हे सिम्बॉल, ‘Help’ खाली FAQ, Contact Us, Terms and Privacy Policy, App Info हे सिम्बॉलही अॅड करण्यात आले आहेत. (हेही वाचा, सावधान! Whatsapp डिलीट करतंय युजर्सचे अकाऊंट; तुम्हीही घ्या काळजी)
नव्या डिझाईननुसार युजर्सच्या Profile वर जाल तर तेथेही वेगळ्या पद्धतीने ‘Name’, ‘About’ आणि ‘Phone’ अशी कॅटेगरी पाहायला मिळेल. व्हॉट्सअपने हे अपडेट बीटाच्या 2.19.45 व्हर्जनसाठी लॉन्च केले आहे.