India Digital Payment Report: आजकाल मुंबई , पुणेकरांना खर्च करण्यासाठी थेट पैसे देणे फारसे आवडत नाही. त्यामुळे ते काहीही खरेदी करायचे असेल तर, पैसे देणे शक्यतो टाळतातच. शक्यतो काय बऱ्याच अंशी टाळतात. इतके की, पैसे न वापरता खर्च आणि खरेदी करण्यात मुंबई (Mumbai) दुसऱ्या तर पुणे (Pune) शहर हे चक्क देशात चौथ्या क्रमांकाचे क्रमांकाचे शहर ठरले आहे. 'वर्ल्डलाइन इंडिया' (Worldline India) या अर्थव्यवहार क्षेत्रातील संस्थेने सादर केलेल्या 'इंडिया डिजिटल पेमेंट रिपोर्ट' (India Digital Payment Report) या अहवालात ही बाब पुढे आली आहे.
'वर्ल्डलाइन इंडिया' या संस्थेने सन 2019 मधील पहिल्या आर्थिक तिमाहीतील अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात डिजिटल पेमेंट पद्धत वापरुन केलेल्या व्यवहारांची नोंद घेत निष्कर्श काढण्यात आला. या अहवालानुसार ऑनलाइन पेमेंट करण्याच्या डेबिट कार्ड आणि क्रेडीट कार्ड या पारंपरिक पेमेंट पद्धतींच्या सोबतच मोबाइल-आधारित पेमेंट पद्धती, ई-वॉलेट या आधुनिक पेमेंट पद्धतीचा झालेला वापरही हा अहवाल तराय करताना विचारात घेण्यात आला. यात जानेवारी २०१९ ते मार्च २०१९ या काळात देशात आधुनिक पेमेंट पद्धतीचा केलेला वापर विचारात घेण्यात आला.
दरम्यान, या अहवालानुसार मुंबई आणि पुणेकर ग्राहकांनी दैनंदिन गरजेच्या वस्तू, हॉटेल, पेट्रोल, कपड्यांची खरेदी आणि इलेक्ट्रोनिक वस्तू यांसाठी सर्वाधिक डिजिटल ट्रान्जॅक्शनचा (आर्थिक व्यवहार) पर्याय वापरला.
जानेवारी ठरला सर्वाधिक ऑनलाइन व्यवहारांचा महिना जानेवारी २०१९ ते मार्च २०१९ या कालावधीतील सर्वोच्च डिजिटल पेमेंट व्यवहाराचा विचार करता जानेवारी महिना हा सर्वोधिक डिजिटल पेमेंट वापरणारा महिना ठरला. त्यातही या महिन्यात प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) आणि त्याच्या अलीकडील, पलिकडील दोन तिन दिवस सर्वोच्च राहिले. विविध कंपन्यांच्या ऑपर्स आणि खरेदी योजना यांमुळेही ऑनलाइन ट्रॅन्जॅक्शन वाढल्याचेही अहवालात म्हटले आहे. (हेही वाचा, Aadhaar Card देखील Deactivate होऊ शकतं, पहा रिअॅक्टिव्हेट कसं कराल?)
दरम्यान, सर्वाधिक ई-ट्रॅन्जॅक्शन करण्यात बेंगळुरू पहिल्या क्रमांकावर आहे. मुंबई दुसऱ्या बंगळुरु तिसऱ्या तर मुंबई चौथ्या क्रमांकावर आहे.