सावधान! Whatsapp डिलीट करतंय युजर्सचे अकाऊंट; तुम्हीही घ्या काळजी
Whatsapp removing Fake Accounts | (Photo credit: archived, edited, representative image)

स्मार्टफोन वापरणाऱ्या मंडळींना व्हॉट्सअप (Whatsapp) म्हणजे काय हे वेगळं सांगायची गरज नाही. स्मार्टफोन वापरणाऱ्या जवळपास सर्वच मंडळींचे (अपवाद वगळून) पानही हालात नाही. पण, Whatsapp बाबत ताजी माहिती अशी की युजर्स मंडीळी आता सावध राहा. Whatsapp युजर्सचे अकाऊंट डिलीट करतो आहे. तुम्हीही वेळीच काळजी घेतली नाही तर, तुमचेही Whatsapp अकाऊंट डिलीट होऊ शकते. प्राप्त माहितीनुसार Whatsapp प्रतिदिन सुमारे 20 लाख Fake Whatsapp Accounts डिलीट केली आहेत. आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की, व्हॉट्सअपने अचानक हे पाऊल का उचलले. या प्रश्नाचे उत्तर असे की, व्हॉट्सअपच्या माध्यमातून पसरवल्य जाणाऱ्या फेक न्यूजना आळा घालण्यासाठी फेसबुक हे पाऊल उचलत आहे. त्यामुळे तुम्हीही फेक न्यूज पसरवरत असाल तर, वेळीच सावध व्हा अन्यथा तुमचेही Whatsapp अकाऊंट डिलीट होऊ शकते.

व्हॉट्सअपने आपल्या युजर्सनाही फेक न्यूज पसरवणाऱ्या अकाऊंट्सची माहिती देण्याबाबत सांगितले आहे. जे मोठ्या प्रमाणावर फेक न्यूज पसरवतात. फेक न्यूजला आला घालण्यासाठी Whatsapp स्थरावर प्रयत्न करत आहे. त्यासाठी Whatsapp प्रमुख प्रसारमाध्यांना जाहिरातीही देत आहे. तसे, संशयीत Whatsapp अकाऊंटची तपासणी करण्यासाठी Whatsapp मशीनचाही वापर केला जात आहे. या मशीनद्वारे ओळख पटवून संशयास्पद अकाऊंट डिलीट केली जात आहेत.

फोर्ब्सने दिलेल्या वृत्तानुसार, संशास्पद संदेशांची देवाणघेवाण करणाऱ्या Whatsapp अकाऊंट्सपैकी जवळपास 95 टक्के अकाऊंट्स डिलीट करण्यात आली आहेत. व्हॉट्सअप प्रवक्त्याने आपल्या प्रतिक्रियेत सांगितले की, Whatsapp असे आढळून आले आहे की, काही लोक व्हॉट्सअपचा चुकीचा वापर करत आहेत. काही युजर्स तर, क्लिक बेट लिंक्स शेअर करतानाही आढळले आहेत. ज्यामुळे जुजर्सची खासगी माहिती ट्रॅक करता येऊ शकते. काही लोक Whatsapp द्वारा आपल्या विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी वापर करत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळेच अशा प्रकारच्या Whatsapp अकाऊंट्स डिलिट करण्याचा निर्णय कंपनीने घेतला. (हेही वाचा,WhatsApp भारतातून काढता पाय घेण्याची शक्यता; सोशल मीडिया कंपन्यांसाठी नवा नियम सरकारच्या विचाराधीन )

दरम्यान, दुसऱ्या बाजूला Whatsapp Users एका नव्या बगमुळेही वैतागले आहेत. युजर्सची तक्रार आहे की, मेसेज पाठवल्यानंतर शेवटचा रिप्लाय, कंपोज विंडेमध्ये राहतो. त्यामुळे युजर्स गोंधळून जातो की, आपण शेवटचा मेसेज पाठवला की नाही. कंपनीने लोकांना सल्ला दिला आहे की, ज्या युजर्सना अशी समस्या येत आहे त्यांनी आपले Whatsapp अपडेट करावे. ज्यामुळे ही समस्या दूर होईल. काही युजर्सना ही समस्या पर्सनल आणि ग्रुप चॅट अशा दोन्ही ठिकाणी येत आहे.