WhatsApp Scam | (Photo Credits: Pixabay)

आज डिजिटल युगामध्ये टेक्नोलॉजी हे दुधारी शस्त्र आहे. टेक्नोलॉजी वापरून काहींचं आयुष्य सुकर झालं आहे तर काहींना याच टेक्नॉलॉजी मुळे फटका देखील बसला आहे. आजकाल सायबर क्राईम, फ्रॉड्सचं प्रमाण वाढलं आहे. सध्या WhatsApp e-challan scam ची चर्चा आहे. आता हा स्कॅम नक्की काय आहे? त्यामध्ये काय होतं आणि त्यापासून सुरक्षित कसं रहायचं? हे सारं जाणून घ्या.

वाढत्या ऑनलाईन स्कॅमच्या पार्श्वभूमीवर Ministry of Electronics and Information Technology ने Information Security Awareness आणत फेक ट्राफिक ई चलन स्कॅमची माहिती दिली आहे. यामध्ये नागरिकांनी सतर्क राहणं आवश्यक आहे. Jumped Deposit Scam म्हणजे काय? UPI Users या नव्या ऑनलाईन फ्रॉड पासून कसे सुरक्षित रहाल? 

WhatsApp E-Challan Scam म्हणजे काय?

WhatsApp E-Challan Scam हा एक सायबर क्राईम आहे. ज्यात फसवणूक करणारी व्यक्ती फसवे मेसेज पाठवते.त्यामध्ये फेक ई चलनचा समावेश असतो. त्यात चलन नंबर, गाडीचा नंबर, फाईनची रक्कम यांचा समावेश असतो. त्यामध्ये चलन एका विशिष्ट लिंक वरून भरण्याचे आवाहन केले जाते. जरी ती लिंक योग्य वाटत असली तरीही त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हांला एका फसव्या साईट वर रिडिरेक्ट केले जाते. त्या ठिकाणी केलेले पेमेंट थेट त्या फसवणूक करणार्‍या व्यक्तीच्या अकाऊंट मध्ये जातं.

चलन खरं की खोटं कसं ओळखायचं?

चलन खरं आहे की खोटं हे ओळखण्यासाठी ते कुणी पाठवलय ते पहा. ते आरटीओ किंवा Ministry of Road Transport and Highways कडून आलेलं असलं पाहिजे. खरं चलन हे अधिकृत सरकारी वेबसाईट वरून येत. "https://echallan.parivahan.gov.in/" ने यूआरएल ची सुरूवात होते. "echallanparivahan.in" अशा संशय निर्माण करणार्‍या वेबसाईट्स पासून दूर रहा. स्पेलिंग मधील चूका बघा, वाहनाबद्दल तपशील बघा. त्यामधील चूका असल्यास ते फेक चलन असतं.