The Department of Telecommunications कडून नवा नियम जारी करण्यात आला आहे. यामध्ये दूर संचार विभागाने Reliance Jio, Airtel and Vodafone-Idea या दूरसंचार कंपन्यांना SIM Exchange किंवा Upgradation मध्ये 24 तासांसाठी एसएमएस सेवा (इन्कमिंग आऊटगोईंग) बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. नव्या सीमच्या अॅक्टिवेशन नंतर आता 24 तास सीम बंद असणार आहे. रिपोर्ट्सनुसार, नवीन सिम किंवा अपग्रेडसाठी विनंती केली गेली आहे किंवा नाही हे सिम सक्रिय झाल्यानंतर 24 तासांच्या आत पडताळून पाहिलं जाईल. ग्राहकाने नवीन सिमची विनंती नाकारल्यास, नवीन सिम सक्रिय केले जाणार नाही. नक्की वाचा: सर्व सिम कार्ड एका दिवसासाठी ब्लॉक होणार? अखेर 'त्या' व्हायरल संदेशामागचे सत्य आले समोर .
SIM Swap Fraud म्हणजे काय?
सध्या ग्राहकांची वैयक्तिक माहिती चोरणे खूप सोपे झाले आहे. याच्या मदतीने फसवणूक करणाऱ्यांना नवीन सिम दिले जाते, त्यानंतर ग्राहकाच्या नकळत जुने सिम बंद केले जाते. त्याच नवीन सिममधून ओटीपी मिळवून बँकिंग फसवणुकीच्या घटना घडतात. पण आता नव्या नियमामुळे त्याला चाप बसणार आहे.
देशात डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. यासोबतच डिजिटल बँकिंग फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे.सिम स्वॅपिंगच्या माध्यमातून बँकिंगची मोठी फसवणूक झाल्याचे अनेकदा आढळून आले आहे. अशा परिस्थितीत, सरकारने सर्व टेलिकॉम कंपन्यांना सिम सक्रिय करण्यासाठी 24 तासांच्या आत नवीन सिम लागू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
DoT कडून मागील महिन्यात देण्यात आलेल्या माहितीनुसार, TRAI च्या भीतीचे निराकरण केले आहे. दूरसंचार विधेयकाच्या मसुद्याच्या अंतर्गत संभाव्य अधिकार कमी करण्याबद्दल त्यांच्या मनात साशंकता होती. सरकार नंतरच्या टप्प्यावर स्वतंत्रपणे नियामक संस्थेच्या बळकटीकरणाशी संबंधित तरतुदी घेण्याच्या पर्यायावर विचार करू शकते.