NASA च्या अंतराळवीरांचे मोठे यश; पहिल्यांदाच International Space Station मध्ये उगवण्यात आला 'मुळा' (Watch Video)
International Space Station मध्ये उगवण्यात आला मुळा (Photo Credit : Twitter)

सध्या अमेरिकेची अंतराळ संस्था नासा (NASA) आणि जगातील इतर अंतराळ संस्था दीर्घ अंतराळ मोहिमेसाठी तयारी करीत आहेत. यासह असेही संशोधन चालू आहे की मानव दीर्घकाळ स्पेस, चंद्र किंवा मंगळावर कसा काय जगू शकेल. परंतु यातला एक सर्वात मोठा अडथळा म्हणजे अंतराळवीरांना भोजन देण्याची तरतूद. याच दिशेने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) मुळा (Radish) उगवण्यात नासाच्या अंतराळवीरांना यश आले आहे. नासाच्या अंतराळवीर केट रूबिन्स (Kate Rubins) यांनी 30 नोव्हेंबर रोजी प्रथमच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर मुळा पिकाची कापणी केली. नासाने या प्रयोगाला प्लांट हॅबिटेट-02 (Plant Habitat-02) असे नाव दिले आहे.

आतापर्यंत अंतराळवीरांना केवळ अल्प काळासाठी अंतराळात पाठविण्यात आले होते. या प्रवासासाठी, ते आपल्याबरोबर पृथ्वीवरवरूनच तयार केलेले विशेष भोजन घेत असत. परंतु जर का मानवांना दीर्घकाळ चंद्रावर रहावे लागले आणि अंतराळवीरांना मंगळावर किंवा इतर कोणत्याही दीर्घ मोहिमेवर जावे लागले तर, त्यांना मोठ्या प्रमाणात अन्न वाहून नेणे शक्य होणार नाही. अशा परिस्थितीत अशी काही व्यवस्था करणे आवश्यक आहे जेणेकरून अंतराळातच अन्न तयार होऊ शकेल. म्हणूनच नासाने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अन्नासंदर्भात अनेक प्रयोग सुरू केले, ज्यात मुळा वाढण्याबाबत मोठे यश मिळाले आहे.

गेल्या महिन्यात, नासाच्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या प्रवासी केट रुबिन्स यांनी आयएसएसच्या प्रगत प्लांट हॅबिटेटमध्ये वाढलेल्या 20 मुळा वनस्पतींचे फोटो शेअर केले होते. हा नासाच्या प्लांट हॅबिटेट-02 (PH-02) प्रयोगाचा एक भाग आहे. अ‍ॅडव्हान्सड प्लांट हॅबिटेट हे वनस्पतींच्या संशोधनासाठी विकासाचे चेंबर आहे. हे चेंबर, एलईडी दिवे आणि नियंत्रित कंपोस्टिंगसह पाणी, पोषण आणि ऑक्सिजन वनस्पतींच्या मुळापर्यंत पोहोचवतो. याच चेंबरमध्ये मुळा वनस्पती उगवण्यात आली आहे. (हेही वाचा: आपल्या आकाशगंगेमध्ये प्रथमच आढळले रहस्यमय असे Fast Radio Burst; खगोलशास्त्रीय कोडे सोडविण्यास शास्त्रज्ञांनी शोधून काढले 'Magnetic Star')

स्पेस स्टेशनमध्ये उगवण्यास मुळाची निवडा केली गेली कारण, शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की तो 27 दिवसांत पूर्णपणे तयार होते, तसेच यामध्ये मोठ्या प्रमाणावर पोषक मुल्ये असतात आणि तो खाण्यालायक असतो.