Indian boy's painting selected for NASA 2019 calendar (Photo credits: Twitter)

नासाच्या वार्षीक कॅलेंडरवर (NASA 2019 Calendar) यंदा भारतीय मुलांचीच चलती पाहायला मिळात आहे. नासाने आपले  कमर्शल क्रू प्रोग्राम 2019 चिल्ड्रन आर्ट वर्क कॅलेंडर नुकतेच लॉन्च केले. या कॅलेंडरच्या मुखपृष्ठावर भारतीय मुलीने रेखाटलेले चित्र पाहायला मिळत आहे. दीपशिखा असे या मुलीचे नाव आहे. ती मूळची उत्तर प्रदेशातील असून, ती केवळ 9 वर्षांची आहे. या कॅलेंडरवर वर्षाच्या एकूण 12 महिन्यांच्या पृष्ठांवर मुलांनी तयार केलेल्या कलेचा अविष्कार पाहायला मिळत आहे. विशेष असे की, या कॅलेंडरवर दीपशिका हिच्यासह इतरही तीन भारतीय मुलांची चित्रे झळकताना दिसतात. त्यातील एक चित्र महाराष्ट्राच्या इंद्रयुद्ध या मुलाचे आहे.

नासाच्या कॅलेंडरवर स्थान मिळालेला महाराष्ट्र पूत्र इंद्रयुद्ध हा 10 वर्षांचा आहे. दीपशिखा आणि इंद्रयुद्ध याच्यासोबत श्रीहन याच्याही चित्राला कॅलेंडरवर स्थान मिळाले आहे. तो, ८ वर्षांचा आहे. श्रीहान आणि इंद्रयुद्ध यांनी एकत्रितपणे हे चित्र तयार केले आहे. दरम्यान, या तिघांसोबत तामिळनाडूच्या बारा वर्षीय थेमुकिलिमन याच्याही चित्राला संधी मिळाली आहे. आतराळ विज्ञान ही संकल्पा घेऊन नासाने कॅलेंडर निर्मिती केली आहे. या संकल्पनेनुसार एकूण १२ चित्रांची निवड करण्यात आली आहे.

इंद्रयुद्ध आणि श्रीहन यांनी तयार केलेले चित्र लिव्हींग अॅण्ड वर्किंग इन स्पेस या संकल्पनेवर आधारीत आहे. थेमुकिलिमन याचे चित्र स्पेस फूड या संकल्पनेवर आधारीत आहे. कॅलेंडरबाबत नासाने जाहीर केलेल्या एका संदेशात म्हटले आहे की, ज्या चित्रांना कॅलेंडरवर स्थान देण्यात आले आहे ती सर्व चित्रे कोणत्या ना कोणत्या मार्गाने आंतराळ या विषयाशी संबंधीत आहेत. आम्ही दिलेल्या संकल्पनेनुसार मुलांनी आंतराळ, आंतराळातील वैज्ञानिक, त्यांचे काम आदी विषयांबाबत मुलांनी अत्यांत चांगल्या पद्धतीने आकलन केले.

नासाने पुढे म्हटले आहे की, मुलांना आंतराळ या विषयाबाबत उत्सुकता निर्माण व्हावी. तसेच, भविष्यात या विषयावर काम करण्यासाठी दिशा मिळावी या हेतूने ही चित्रे मागवण्यात आली होती. भविष्यासाठी आंतराळ वैज्ञानिक, अभियंते, प्रयोग आदिंसाठी मुलांना प्रोत्साहीत करणे हा आणचा हेतू होता, असेही नासाने म्हटले आहे.