Chandra Grahan 2022 Live Streaming: 16 मे रोजी होणार वर्षातील पहिले चंद्रग्रहण; जाणून घ्या वेळ आणि त्याचा जगावर होणारा परिणाम
चंद्रग्रहणाच्या वेळी जेव्हा चंद्र पूर्ण ग्रहणयुक्त असतो, म्हणजेच जेव्हा पूर्ण चंद्रग्रहण असते तेव्हा ते चंद्रग्रहण ब्लड मूनसारखे दिसते. ब्लड मूनची घटना खूप सुंदर आहे. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते
Chandra Grahan 2022 Live Streaming: वर्षातील पहिले चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2022) 16 मे रोजी होणार आहे. 15 दिवसांच्या कालावधीतील हे या वर्षातील दुसरे ग्रहण असेल. यापूर्वी वर्षातील पहिले सूर्यग्रहण 30 एप्रिल रोजी झाले होते. ग्रहणाची घटना धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची मानली जाते. 16 मे रोजी होणारे चंद्रग्रहण पूर्ण ग्रहण असेल. भारतीय वेळेनुसार हे चंद्रग्रहण 16 मे रोजी सकाळी 08:59 पासून सुरू होईल, जे सकाळी 10.23 पर्यंत राहील. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे, त्याचा सुतक कालावधीदेखील असणार नाही.
चंद्रग्रहणाच्या वेळी जेव्हा चंद्र पूर्ण ग्रहणयुक्त असतो, म्हणजेच जेव्हा पूर्ण चंद्रग्रहण असते तेव्हा ते चंद्रग्रहण ब्लड मूनसारखे दिसते. ब्लड मूनची घटना खूप सुंदर आहे. खगोलशास्त्रज्ञांच्या मते, जेव्हा पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते तेव्हा चंद्रग्रहण होते. चंद्रग्रहण झाल्यास पृथ्वीची सावली चंद्राच्या प्रकाशाला झाकून टाकते. जेव्हा सूर्यप्रकाश पृथ्वीच्या वातावरणावर आदळून चंद्रावर पडतो तेव्हा तो अधिक उजळ होतो. अशा स्थितीत जेव्हा चंद्र पृथ्वीच्या जवळ येतो, तेव्हा तो गडद लाल दिसतो.
2022 सालचे पहिले चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. याआधी 30 एप्रिलला सूर्यग्रहण झाले होते तेही भारतात दिसले नव्हते. हे चंद्रग्रहण युरोप, दक्षिण-पश्चिम आशिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक महासागर, हिंदी महासागर, अटलांटिक आणि अंटार्क्टिकामध्ये दिसणार आहे.
या ठिकाणी पाहू शकता थेट प्रक्षेपण- (Chandra Grahan 2022 Live Streaming)
चंद्रग्रहणाचे सर्वसामान्य परिणाम-
चंद्रग्रहणाचा प्रभाव 15 दिवस ते 1 महिना राहील. या काळात देशात आणि जगात नैसर्गिक आपत्ती वाढण्याची अपेक्षा आहे. किनारी भागात वाद होऊ शकतात. युद्ध थांबलेले दिसेल. चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे महागाई वाढेल आणि जनक्षोभही वाढेल. भारताची राशी कर्क आहे आणि चंद्रग्रहण त्याचा स्वामी आहे. त्यामुळे भारतात मोठे राजकीय बदल घडू शकतात. महिला राजकारणी किंवा कलाकारासाठी हा तापदायक काळ ठरू शकेल.
ग्रहणाच्या वेळी तयार होणाऱ्या ग्रहांच्या स्थितीचा भारताच्या हवामानावरही परिणाम होईल. ग्रहांची स्थिती या वर्षी मान्सून लवकर येण्याचे संकेत देत आहे. सामान्यतः नैऋत्य मान्सून 1 जून रोजी केरळमध्ये प्रवेश करतो. परंतु यंदा 16 मे रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणाच्या वेळी तयार झालेल्या ग्रहदशेमुळे मान्सून काही दिवस लवकर येणार आहे. केरळमध्ये मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सून दाखल होऊ शकतो.
(वरील माहिती इंटरनेट आधारीत आहे. या माहितीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही)