Microplastics Environmental Impact: जपानी संशोधकांनी (Japanese Researchers) केलेल्या बाह्य संशोधनात प्रथमच ढगांमध्येही मायक्रोप्लास्टिक्स (Microplastics) आढळून आले आहे. त्यााच पर्यावरणावर आणि खास करुन महासागरातील परिसंस्थेवर होणारा परिणाम चिंतेचा विषय ठरु शकतो अशी भीतीह त्यांनी व्यक्त केली आहे. संशोधकांनी म्हटले आहे की, मायक्रोप्लास्टिक्सचा हवामानावर परिणाम होऊ शकतो आणि मानवी शरीरासाठी हानीकारक असू शकते. त्यामुळे तपशिलांची अधिक तपासणी करण्यासाठी आपला गट संशोधन सुरू ठेवेल, असेही या अभ्यासकांनी म्हटले आहे.
जपानमधील वासेडा विद्यापीठाचे प्राध्यापक हिरोशी ओकोची (Hiroshi Okochi ) आणि इतर सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील संशोधक गटाने अभ्यास करुन अहवाल दिला. यात म्हटले आहे की, त्यांनी कानागावा प्रांतातील योकोहामाच्या पश्चिमेकडील माउंट फुजीच्या शिखरावर आणि पायथ्याशी तसेच माउंट तंझावा-ओयामाच्या शिखरावर ढगांमधून घेतलेल्या पाण्याचे 44 नमुने तपासले. नमुन्यांचे विश्लेषण करताना या गटाला यात एकूण 70 मायक्रोप्लास्टिक कण आढळले, ज्यांची नऊ प्रकारांमध्ये वर्गवारी केली जाऊ शकते.
नमुन्यांमध्ये आढळलेले कण संशोधकांनी 7.1 आणि 94.6 मायक्रोमीटर (मीटरच्या दशलक्षांश) दरम्यान मोजले. ज्यांची सरासरी केंद्रीयता 6.7 ते 13.9 कण प्रति लिटर होती. असे मानले जाते की मायक्रोप्लास्टिक्स समुद्राच्या स्प्रेसह वातावरणात वाहून नेले गेले आणि ते ढगांमध्ये घणरुपात साचले. निक्की एशिया वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे.
दरम्यान, अवकाशात असलल्या मायक्रो प्लास्टिकच्या कणांचे काय परिणाम होऊ शकतात याविषयी आत्तापर्यंत फार कमी माहिती आणि संशोधन झाले आहे. त्याचा पर्यावरमावर मोठा परिणाम होऊ शकतो असा तज्ज्ञांचा दावा आहे.
अभ्यासकांनी म्हटले आहे की, ढगंतील पावलाच्या पाण्यासोबत हे मायक्रोप्लास्टिक जमीनीवर आल्यावर शेतातील उत्पादने आणि पशुधनाद्वारे मानवी शरीरात प्रवेश करू शकतात. ज्याचे मानवी आरोग्यावर नकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतात, असे संशोधकांचे म्हणणे आहे.