भारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) तंत्रज्ञानात पुन्हा एकदा नवे पाऊल टाकत आहे. इस्त्रो आज पीएसएलवी-सी 50 ( PSLV-C50 Rocket) अवकाशात सोडणार आहे. त्यासाचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. श्रीहरिकोटा (Sriharikota) येथील सतीश धवन आंतराळ केंद्रावरुन हे रॉकेट अवकाशात झेपावणार आहे. आज (गुरुवार, 17 डिसेंबर) दुपारी 3.41 मिनिटांनी हे रॉकेट आंतराळात झेपावणार आहे.
इस्त्रोने म्हटले आहे की पीएसएलव्हीचे 52 वे मिशन पीएसएलवी-सी 50 श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्राच्या द्वितीय प्रक्षेपण पॅडवरुन झेपावेल. उपग्रह सीएमएस-01 असे याचे नाव आहे. हे प्रक्षेपण दुपारी 3.41 वाजता निश्चित वेळेनुसार पार पडेन. या उपग्रहाच्या प्रक्षेपणाची वेळ निश्चित करण्यात आली असली तरी तत्कालीन वातावरणावरही अनेक गोष्टी अवलंबून असणार आहेत. हा उपग्रह उपग्रह सीएमएस-01 ‘एक्सटेंडेड सी बँड सेवेच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. याच्या प्रमुख कक्षेत भारतातील बेटे अंडमान निकोबार और लक्षद्वीप द्वीप समूह असतील. सीएमएस-01 देशातील 42 वा संचार उपग्रह आहे. (हेही वाचा, ISRO: भारतीय अवकाश संशोधन संस्था आज अवकाशात सोडणार PSLV-C50 Rocket )
PSLV-C50 प्रदीर्घ काळापासून लॉंचिंगसाठी प्रलंबीत होता. गेल्या काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात वादळ आले तसेच पर्यावरणातही मोठे बदल झाले. त्यामुळे योग्य प्रकारचे हवामान नसल्याने PSLV-C50 चे प्रक्षेपण करण्यात आले नव्हते.
Filling of fuel and oxidizer for the second stage(PS2) of #PSLVC50 completed.#CMS01
Updates will continue...
— ISRO (@isro) December 17, 2020
PSLV-C50 सीएमएस -01 चे आयुर्मान साधारण 7 वर्षांचे होते. 11 जुलै 2011 मध्ये प्रक्षेपीत करण्यात आलेल्या Gsat - 12 या उपग्रहाची जागा PSLV-C50 सीएमएस -01 घेणार आहे. हा उपग्रह नेटवर्क कनेक्टीवीटीसाटी महत्त्वपूर्ण कामगिरी करेन. प्रामुख्याने अंडमान, निकोबार आइलैंड मध्ये आणखी एक सबमरीन ऑप्टिकल फाइबर सुमारे 2313 किलोमीटर इतके याचे कार्यक्षेत्र असेन.