ISRO launches SSLV-D1: इस्रोने सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपीत केला पृथ्वी निरीक्षण उपग्रह
SSLV-D1 | (Photo Credit - Twitter/ANI)

ISRO SSLV-D1 EOS-02 Mission: भारतीय अंतराळ संशोधन संस्था ( Indian Space Research Organisation) म्हणजेच इस्त्रो (ISRO) ने सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरीकोटा येथून पृथ्वी निरीक्षण उपग्रह (EOS-02) वाहून नेणारा SSLV-D1 आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेला उपग्रह-आझादीसॅट प्रक्षेपित केला. हे प्रक्षेपण अनेक कारणांसाठी खास आहे. हा SSLV-D1/EOS-02 ‘लाँच-ऑन-डिमांड’ तत्त्वावर 500 किलोपर्यंतच्या उपग्रहांचे लोअर अर्थ ऑर्बिटमध्ये प्रक्षेपण करतो.

इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार, रॉकेट एसएसएलव्ही-D1 (SSLV-D1)ने आज सकाळी 9.18 वाजता श्रीहरिकोटा (Sriharikota) येथील लॉन्च पॅडरुन उड्डाण घेतले. जास्तीत जास्त 500 किलोग्राम इतके वजन वाहून नेण्याची क्षमता असलेले हे रॉकेट एक पृथ्वी अवलोकन उपग्रह 02 वाहून नेईन. याला आगोदर 'माइक्रोसेटेलाइट-2 ए'('Microsatellite-2A') म्हणून ओळखले जात होते. याचे वजन साधारण 142 किलोग्राम आहे. (हेही वाचा, Rainbow-Coloured Pluto Viral Photo: NASA ने प्लुटो ग्रहाचा शेअर केला खास फोटो; नेटिझन्स झाले फोटो पाहून अचंबित!)

ट्विट

इस्रोच्या मोठ्या मोहिमेबद्दल घ्या अधिक जाणून

SSLV-D1/EOS-02 Mission: स्पेस एजन्सीने रविवारी आपल्या वेबसाइटवर सांगितल्यानुसार, काउंटडाउन 02.26 तासांनी सुरू झाले . EOS-02 आणि AzaadiSAT उपग्रहांना पृथ्वीच्या निम्न कक्षेत ठेवण्याचे उद्दिष्ट आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर (SHAR) येथील पहिल्या प्रक्षेपण पॅडवरून सकाळी 9.18 वाजता लिफ्ट-ऑफ होणार आहे. ISRO ने माहिती देताना म्हटले आहे की, आझादीसॅटमध्ये (AzaadiSAT ) 75 वेगवेगळे पेलोड आहेत, प्रत्येकाचे वजन सुमारे 50 ग्रॅम आहे, जे देशभरातील ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी विकसित केले आहे, ज्यांना हे पेलोड तयार करण्यासाठी मार्गदर्शन प्रदान करण्यात आले होते, असे ISRO म्हणते.

‘स्पेस किड्झ इंडिया’ विद्यार्थी संघाच्या ग्राउंड सिस्टमचा वापर या उपग्रहाकडून डेटा प्राप्त करण्यासाठी केला जाईल. दरम्यान, EOS-02 - एक पृथ्वी निरीक्षण उपग्रह - जो SSLV द्वारे देखील वाहून नेला जाणार आहे. तो कृषी, वनीकरण आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी आहे.