Chandrayaan 2 बाबत के.सिवन यांनी दिली मोठी आशादायक बातमी; ISRO ला विक्रम लॅन्डर चा शोध लागला; संपर्क प्रस्थापित करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू
चंद्रयान-2 (Photo Credits: ISRO Video)

22 जुलै 2019 दिवशी इस्त्रो शास्त्रज्ञांकडून श्रीहरिकोटा येथून अवकाशात झेपावलेले चांद्रयान 2, 7 सप्टेंबरच्या मध्यरात्री 1 .38 वाजता सॉफ्ट लॅन्डिंग करणं अपेक्षित होतं. मात्र विक्रम लॅन्डरचा काल (7 सप्टेंबर) चंद्राजवळ 2.1 किमी वर असताना अचानक संपर्क तुटल्याने सार्‍यांचाच हिरमोड झाला होता. मात्र आता इस्त्रो कडून एक आशादायी माहिती समोरी आली आहे. इस्त्रो अध्यक्ष के.सिवन यांनी ANI या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, संशोधकांना चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान 2 चे लॅन्डर विक्रम दिसले आहे. ऑर्बिटर कडून काढण्यात आलेल्या थर्मल इमेजनुसार लॅन्डर चंद्राच्या पृष्ठभागावर आहे. तसेच विक्रम लॅन्डरसोबत पुन्हा संपर्क साधण्याचं काम इस्त्रोचे शास्त्रज्ञ आणि संशोधक करत आहेत. अद्याप विक्रम लॅन्डरशी संपर्क झालेला नसून तो पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी इस्त्रो शर्थीचे प्रयत्न करत आहे असा दावा करण्यात आला आहे. ISRO चीफ के. सिवन यांना अश्रू अनावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिठी मारत दिला धीर (Watch Video).

ANI Tweet

चंद्र मोहिमेच्या मदतीने चंद्राच्या दक्षिण धुव्रावर संशोधन केले जाणार होते. तेथील खनिजांचा अभ्यास करण्यासाठी ही मोहिम महत्त्वाची असल्याचं सांगण्यात आले आहे. चंद्रयान मोहिमेमध्ये 13 पेलोड आणि 8 ऑर्बिट, 3 लॅन्डर आणि दोन रोव्हर होते. जीएलएसव्ही मार्क 3 (GSLV MK III)या प्रक्षेपकाद्वारा श्रीहरीकोटा येथून चांद्रयान 2 चे प्रक्षेपण झाले. मात्र त्यानंतर विक्रम लॅन्डरचं सॉफ्ट लॅन्डिंग होणं अपेक्षित होतं. तसे होऊ न शकल्याने काल इस्त्रो कार्यालयात निराशा पसरली होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शास्त्रज्ञांसह भारतीयांना विज्ञानात प्रयोग असतो अपयश नाही. या अनुभवाचा फायदा पुढील मोहिमांसाठी करा असं म्हणत सार्‍यांनाच धीर दिला होता. काही दिवसांपूर्वीच चांद्रयान 2 ने पाठवलेला चंद्राचा पहिला फोटो इस्त्रोने शेअर केला होता. सोशल मीडीयावर ISRO संशोधकांना सलाम करण्यासाठी मीम्सचा पाऊस; सामान्यांपासून दिग्गजांकडून चांद्रयान 2 मोहिमेतील प्रयत्नांचं कौतुक!

इस्त्रो कडूनही ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत असल्याने पुढील काही महिने चंद्राचा अभ्यास केला जाईल तसेच विक्रम लॅन्डरशी संपर्क साधण्याचे सारे प्रयत्न केले जातील असे सांगण्यात आले होते.