
ऑक्टोबर महिन्याची सुरूवात Full Harvest Moon ने झाल्यानंतर आता या महिन्याचा शेवट Hunter's Blue Moon ने होणार आहे. यंदा ऑक्टोबर महिन्यात दोनदा पौर्णिमेचा चंद्र पाहण्याची दुर्मिळ संधी खगोलप्रेमींना मिळाली आहे. दरम्यान ऑक्टोबर महिन्याचा शेवटचा दिवस हा हॅलोवीन म्हणून देखील साजरा करण्याची पाश्चात्य संस्कृती आहे. त्यामुळे यंदा हॅलोवीनची गूढ रात्र आणि ब्लु मुन एकत्र आले आहेत. इंग्रजीमध्ये ‘Once in a Blue Moon’असा शब्द प्रचार आहे, त्याचा अर्थच क्वचित घडणारा प्रकार असा आहे. त्यामुळे ब्लू मुन ही घटना देखील काही वर्षात क्वचित दिसते. यंदा 2020 मध्ये आपण अनेक अनकलनीय घटना पाहतच आहोत त्यामध्ये आता ब्लू मुन पहण्याची देखील एक दुर्मिळ संधी सोडू नका. पण हा ब्लू मुन कसा कुठे किती वाजता पाहू शकाल हे तुम्हांला ठाऊक आहे का? तुमच्या मनातील या ब्लू मुन बद्दलच्या काही गोष्टींची उत्तर खाली दिलेल्या माहितीमध्ये नक्की जाणून घ्या. Blue Moon on October 31: कोजागिरी पौर्णिमेच्या दुसर्या 'ब्लू मुन' पाहण्याची संधी; पण खरंच चंद्र निळा दिसणार का?
ब्लू मुन, हंटर्स ब्लू मुन म्हणजे काय?
सामान्यपणे एका महिन्यात एकच पौर्णिमा येते पण ज्या महिन्यात दोन पौर्णिमा येतात त्यामध्ये दुसर्या पौर्णिमेचा उल्लेख हा ब्लू मून म्हणून केला जातो. हंटर्स मून या शब्दाचा उल्लेख प्रामुख्याने ऑक्टोबर महिन्याच्या पौर्णिमेच्या चंद्रासाठी केला जातो. परंतू ती हार्वेस्ट मून नंतर येणारी पौर्णिमा असणं अपेक्षित असतं. हंटर्स मून या नावामागे अनेक गोष्टी आहेत. पण पूर्वीच्या काळी थंडी पडण्यापूर्वी खाण्याची तसबीस करण्यासाठी आदिवासी लोकं याच पौर्णिमेला शिकारीसाठी जात असे. म्हणून ऑक्टोबरच्या चंद्राला हंटर्स मून असं म्हटलं जातं.
हंटर्स ब्लू मुन कधी आणि कसा बघाल?
हंटर्स ब्लू मुन ही यंदाची दुर्मिळ खगोलीय घटना आहे. भारतामध्ये हा चंद्र रात्री 8 वाजून 19 मिनिटांच्या आसपास स्पष्टपणे पाहता येईल. ही पौर्णिमा पावसाळ्या नंतर येणारी पहिलीच असल्याने आभाळ स्वच्छ असते. तुम्ही थेट डोळ्यांनी हा पौर्णिमेचा चंद्र पाहू शकता. याकरिता टेलिस्कोपची गरज नाही.
दरम्यान ब्लू मून ही घटना काही दुर्मिळ नाही. दर 2-3 वर्षांच्या फरकाने ब्लू मुन बघायला मिळतोच पण यंदा हॅलोवीन आणि हंटर्स मून एकत्र येणं हा दुर्मिळ योग आहे. यापूर्वी 1944 ला हॅलोविनच्या रात्री पौर्णिमेचा चंद्र होता. तर भविष्यात 2039 ला असा योग पुन्हा जुळून येईल.