Geomagnetic Storm: भू-चुंबकीय वादळ पृथ्वीला धडकण्याची शक्यता, GPS प्रणाली, मोबाई, इंटरनेट सेवांना धोका
Geomagnetic Storm | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

एक मोठे भू-चुंबकीय वादळ (Geomagnetic Storm) पृथ्वीला धडकण्याची शक्यात अमेरिकेतील नॅशनल वेदर सर्व्हिसच्या स्पेस वेदर प्रिडिक्शन सेंटरने (SWPC) व्यक्त केली आहे. एसडब्ल्यूपीसी च्या तज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या शक्यतेनुसार 28 ऑगस्टला सूर्याच्या कक्षेतून काही विशिष्ट चुंबकीय लहरी बाहेर पडण्याची शक्यता आहे. या लहरी पृथ्वीवर आदळल्यास पृथ्वीवर मॅग्नेटोस्फीअरची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. हे वादळ प्रति तास 1609344 किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या दिशेने प्रवास करत असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणने आहे. हे वादळ पृथ्वीवर आल्यानंतर टीव्ही-रेडिओ, मोबाईल फोन आदींच्या संदेशवहनात बाधा निर्माण होऊ शकतो.

अभ्यासकांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यमांनी  म्हटले आहे की, भूचुंबकीय वादळ म्हणजे सूर्यापासून निघणारी किरणे. ज्याला कोरोनल मास असेही म्हटले जाते. ही किरणे पृथ्वीवरील जीवांसाठी अत्यंत धोकादायक आणि हानिकारक ठरु शकतात. प्रामुख्याने या वादळाचा फटका जगभरातील अनेक देशांच्या इंटरनेट सेवेला बसू शकतो. ज्यामुळे जगभरातील इंटरनेट सेवा काही दिवसांसाठी ठप्प होऊ शकते. याचा परिणाम जगभरातील वीजनिर्मीतीवरही होऊ शकतो. अनेक देशात पॉवर ग्रीड फेल होऊ शकता. ज्यामुळे संबंधीत देशातील काही भाग वीजपुरवठा खंडीत झाल्याने अंधारात राहू शकतात. (हेही वाचा, Saturn's Closest Approach to Earth: पृथ्वी आणि शनि आज 1 वर्ष 13 दिवसांनी येणार जवळ; पहा या अदभूत नजार्‍याची भारतातील वेळ आणि इतर वैशिष्ट्यं!)

अभ्यासकांनी म्हटले आहे की, भू-चुंबकीय वादळामुळे समुद्रातून पसरलेल्या इंटरनेट केबलवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. काही अभ्यासकांचे म्हणने असेकी, इंटरनेटच्या फायबर ऑप्टिक्सवर सौर वादळातून निघणाऱ्या जियोमैग्नेटिक लहरींचा थेट परिणाम होणार नाही. परंतू जगभरातील अनेक देशांना जोडणाऱ्या समुद्री इंटरनेट केबलला त्याचा मोठा फटका बसू शकतो. ज्या देशांनी या केबल्सना आपल्या ऑप्टिक्ससोबत जोडले आहे. ते देश इंटरनेट सेवांपासून काही दिवस बाधीत होऊ शकतात. या वादळामुळे उपग्रहीय सेवांवरही परिणाम होऊ शकतो. जेणेकरुन मोबाईल, टीव्ही आदी उपकरणांना त्याचा फटका बसून प्रसारणात अडथळे येऊ शकतात.