Saturn's Closest Approach to Earth: पृथ्वी आणि शनि आज 1 वर्ष 13 दिवसांनी येणार जवळ; पहा  या अदभूत नजार्‍याची भारतातील  वेळ आणि इतर वैशिष्ट्यं!
Saturn| PC: Pixabay.com

खगोलीय विश्वामध्येही अनेक अदभूत घटना सुरू असतात. अशांपैकी एक दुर्मिळ घटना आज घडणार आहे. आज पृथ्वी (Earth) आणि शनि (Saturn) अंदाजे 1 वर्ष 13 दिवसांनी जवळ येणार आहे. भारतीय वेळेनुसार ही खगोलीय घटना सकाळी 11.30 च्या सुमारास होणार आहे. भारतामध्ये या वेळी सकाळ असल्याने तुम्ही थेट आकाशात शनी पाहू शकणार नाही. पण जगाच्या ज्या भागात यावेळी रात्र असणार आहे तेथे मात्र तुम्हांला हा अद्भूत नजारा पहायला मिळणार आहे.

पृथ्वीला सूर्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी 365 दिवसांचा काळ लागतो. पण शनीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी सुमारे 29.5 वर्ष इतका वेळ लागतो. त्यामुळे वर्षातून एकदा पृथ्वी आणि शनि आपल्या मार्गक्रमणात कक्षीय फेर्‍यांमध्ये एकमेकांजवळ येतात. 1 वर्ष 13 दिवसांच्या या कालखंडातने आज दोन्ही ग्रह एकमेकांच्या जवळ असतील.

पृथ्वी आणि शनी यापूर्वी मागीलवर्षी 20 जुलै 2020 ला जवळ आले होते तर पुढील वर्षी 14 ऑगस्ट 2022 ला एकमेकांच्या जवळ असतील. नक्की वाचा: Moon Wobble: 2030च्या मध्यात पृथ्वीवर पूराचे प्रमाण वाढणार, नासाने केले स्पष्ट, वाचा कशी होणार पाणीपातळीत वाढ.

पृथ्वी आणि शनी जेव्हा एकमेकांच्या सर्वात जवळ असतात तेव्हा त्यांच्यामधील अंतर हे अंदाजे 120 करोड किमी इतकं असतं. शनी आणि पृथ्वी सर्वात लांब 50 कोटी किमी अंतरावर असतात.

दरम्यान मागील वर्षी शनि आणी गुरू हे दोन्ही ग्रह जणू एकमेकांत विलीन झाल्याप्रमाणे दिसत होते. 21 डिसेंबरची ही घटना भारतामध्ये पश्चिम बंगाल आणि कोलकाताच्या काही भागांमधून पहायला मिळाली होती. थंडीच्या दिवसांमुळे अनेकांना दाट धुक्यात ते थेट डोळ्यांनी पहाणं शक्य नव्हतं.