Chandrayaan 2 (Photo Credits: ISRO)

Chandrayaan 2 New Launch Date: भारताची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिम चांद्रयान 2, 15 जुलैच्या मध्यरात्री अवकाशात झेपावणार होतं. मात्र काही तांत्रिक दोषामुळे हे उड्डाण रद्द करण्यात आलं होतं. मात्र आता हा दोष दूर करत इस्त्रोचे संशोधक पुन्हा चांद्रयान 2 साठी सज्ज झाले आहेत. इस्त्रोच्या (Indian Space Research Organisation) अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सोमवार 22 जुलै दिवशी दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी चांद्रयान आकाशात झेपावण्यासाठी सज्ज झाले आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा (Sriharikota) येथून त्याचे प्रक्षेपण होणार आहे. यापूर्वीही चांद्रयान उड्डाणाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले होते. 15 जुलैच्या रात्री उड्डाणाच्या तासाभरापूर्वी संशोधकांना तांत्रिक दोष समजला होता. त्यामुळे चांद्रयान उड्डाण रद्द करून लवकरच नवी तारीख जाहीर करू असं इस्त्रोकडून सांगण्यात आले होते. Chandrayaan 2 Launch Live: चंद्रयान 2 चं लाईव्ह लॉंचिंग घसबसल्या कुठे, कधी पहाल?

इस्त्रोचं अधिकृत ट्विट

चंद्रयान मोहिमेमध्ये 13 पेलोड आणि 8 ऑर्बिट, 3 लॅन्डर आणि दोन रोव्हर असतील. जीएलएसव्ही मार्क 3 (GSLVMKIII) प्रक्षेपकाद्वारा श्रीहरीकोटा येथून चांद्रयान 2 चे प्रक्षेपण होणार आहे. ISROची महत्वाकांक्षी मोहीम Chandrayaan 2 विषयी या 10 खास गोष्टी

सुमारे 52 दिवसांचा प्रवास करून हे यान चंद्राच्या दक्षिण धुव्रावर उतरणार आहे. तेथील खनिजांचा अभ्यास केला जाणार आहे. चंद्राच्या या भागावर पहिल्यांदाच संशोधन होणार असल्याने भारतासह जगभरातून या मोहिमेबददल मोठ्या अपेक्षा आहेत.