Chandrayaan 2 Launch (Photo Credits: Twitter)

इस्त्रोची महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिम 'चांद्रयान 2' चं आज अखेर यशस्वी उड्डाण झालं आहे. यापूर्वी 15 जुलै दिवशी चांद्रयान 2 (Chandrayaan 2) चं उड्डाण होणं अपेक्षित होतं. मात्र उड्डाणापूर्वी सुमारे तासभर आधी संशोधकांना तांत्रिक दोष समजला आणि ते रद्द करण्यात आलं. मात्र आज भारतीय वेळेनुसार दुपारी 2.43 मिनिटांनी चैन्नई येथील श्रीहरिकोटा जवळ सतीश धवन अवकाश केंद्राच्या(Satish Dhawan Space Centre) येथून चांद्रयान 2 चं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं आहे. या उड्डाणानंतर सार्‍यांनीच आनंद व्यक्त केला आहे.  चांद्रयान 2 च्या प्रक्षेपणानंतर त्याची प्रगती योग्य दिशाने असल्याची माहिती इस्त्रोच्या संशोधकांनी सांगितलं आहे.  ISROची महत्वाकांक्षी मोहीम Chandrayaan 2 विषयी या 10 खास गोष्टी

चंद्र मोहिमेच्या मदतीने चंद्राच्या दक्षिण धुव्रावर संशोधन केले जाणार आहे. तेथील खनिजांचा अभ्यास करण्यासाठी ही मोहिम महत्त्वाची असल्याचं सांगण्यात आले आहे. रविवार (21जुलै) च्या संध्याकाळी 6.43 मिनिटांनी काऊंट डाऊन सुरू झाले आहे. जीएलएसव्ही मार्क 3 (GSLVMKIII) प्रक्षेपकाद्वारा श्रीहरीकोटा येथून चांद्रयान 2 चे प्रक्षेपण होणार आहे. या प्रक्षेपकाला 'बाहुबली' असं देखील संबोधलं जातं. याची किंमत सुमारे 375 कोटी असून चांद्रयान 2 साठी 603 कोटी खर्च केला आहे.  लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा  

ANI Tweet  

इस्त्रोच्या संशोधकांनी केलेल्या दाव्यानुसार हे चांद्रयान 2 सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चंद्रावर पोहचेल. भारताने पहिले चांद्रयान ऑक्टोबर 2008 साली पाठवले होते. हे यान देखील मानव विरहित होते