Chandra Grahan 2023: आज वर्षातील पहिले चंद्रग्रहण! ग्रहण दोष टाळण्यासाठी ग्रहण संपल्यानंतर करा हे काम!
Chandra Grahan प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या सूर्यग्रहणानंतर आज 5 मेच्या रात्री वर्षातील पहिले चंद्रग्रहण (Chandra Grahan) आहे. ग्र्हण ही अवकाशातील अगदी सामान्य घटना आहे. जगात खगोलप्रेमी अशा दुर्मिळ घटना पाहण्यासाठी उत्सुक असतात. पण भारतामध्ये चित्र थोडं वेगळं आहे. भारतात ग्रहणाचा संबंध अनेक जण धार्मिक गोष्टींशी देखील लावतात. त्यामुळे ग्रहणाशी निगडीत काही समज- गैरसमज पाळले जातात. दरम्यान आजचं ग्रहण भारतात दिसणार नसल्याने या सार्‍या रीती भाती आज भारतात पाळल्या जाणार नाहीत. परंतु संभाव्य धोका टाळण्यासाठी काही कार्य ग्रहण संपल्यानंतर केले पाहिजे असे बहुतेक ज्योतिषी सुचवतात. नक्की वाचा: Lunar Eclipse in May 2023: भारत आणि जगभरात दिसणाऱ्या पेनम्ब्रल चंद्र ग्रहणची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाची माहिती,जाणून घ्या .

ग्रहणानंतर काय करावं? 

चंद्रग्रहण संपताच आंघोळ करावी आणि त्यानंतर कोणतीही पांढरी वस्तू, वस्त्र, छत्री इत्यादी गरोदर स्त्रियांच्या हातून दान करा. यामुळे चंद्र दोष दूर होतो आणि जन्मलेल्या मुलावर कोणताही वाईट परिणाम होत नाही.

चंद्रग्रहणानंतर शिळे अन्न खाऊ नये. हे अन्न जनावरांना द्या. घरामध्ये दूध किंवा दुधापासून बनवलेले दही, चीज इत्यादी असल्यास ते फेकण्याऐवजी ग्रहण सुरू होण्यापूर्वी त्यामध्ये तुळशीची पाने टाका.

जर तुमचा ग्रहणाच्या आध्यात्मिक परिणामावर विश्वास असेल तर ग्रहण संपल्यानंतर तुम्ही गंगा नदीत किंवा घरातील पाण्यात गंगेचे पाणी मिसळून स्नान करा. यानंतर गंगाजल थोडं प्राशन करा. असे केल्याने ग्रहण दोष दूर होतो आणि गर्भात वाढणारे मूल सुरक्षित राहते.

चंद्रग्रहण संपल्यानंतर लगेच घराभोवती गंगाजल शिंपडल्याने घरातील ग्रहणामुळे निर्माण होणारा नकारात्मक शक्तींचा प्रभाव संपतो. ग्रहण उशिरा पहाटे 1 वाजता संपणार असल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी संपूर्ण घराची स्वच्छता करा.

ॐ ह्लीं बगलामुखी सर्वदुष्टानां वाचं मुखं पदं स्तंभ

जिह्ववां कीलय बुद्धि विनाशय ह्लीं ॐ स्वाहा।। या मंत्राचा जप करा.

चंद्रग्रहणानंतर स्नान करून भगवान शिवाची पूजा केल्याने ग्रहणाचा प्रभाव लवकर संपतो. शिवलिंगावर बेलपत्र, दूध, मध, चंदन, पांढरी फुले इत्यादी भगवान शंकराच्या आवडत्या वस्तू अर्पण करा आणि भगवान भोलेनाथाचे ध्यान करा.

चंद्रग्रहण संपल्यानंतर चंद्राला कच्चे दूध अर्पण करावे. तुम्ही पाण्यात पांढरी फुले घालून चंद्राला अर्घ्य देऊ शकता. यामुळे गर्भवती महिलेच्या पोटात वाढणाऱ्या बाळावर राहू-केतूचा परिणाम होणार नाही.

आजचं चंद्रग्रहण रात्री 8.45 ला सुरू होणार असून सुमारे  1 वाजता संपणार आहे. भारतामध्ये हे ग्रहण दिसणार नाही पण ऑनलाईन तुम्ही त्याचं प्रक्षेपण अनेक चॅनेल्स वर पाहू शकणार आहात.

(टीप: सदर लेख केवळ माहिती देण्याच्या उद्देशाने लिहण्यात आला आहे. अंधश्रद्धेचा पुरस्कार करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही. यामधील कोणत्याही गोष्टीची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही.)