Representational Image (Photo Credits: Wikimedia Commons)

यंदाच्या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण (Chandra Grahan) 16 मे दिवशी दिसणार आहे. 16 मे ला वैशाख पौर्णिमा (Vaishakh Pournima), बुद्ध पौर्णिमा (Buddha Pournima) आणि चंद्र ग्रहण (Chandra Grahan) अशा तिन्ही गोष्टी एकाच दिवशी जुळून आल्या आहे. दरम्यान 16 मेच्या चंद्रग्रहणाच्या निमित्ताने खगोलप्रेमींना 2022 मधील पहिल्या ब्लड मूनचं (Blood Moon) देखील दर्शन घडणार आहे. त्यामुळे आकाशातील अशा या अदभूत घटनांकडे डोळे लावून बसणार्‍या खगोलप्रेमींसाठी 16 मे ही तारीख यंदा खास ठरणार आहे. भारतात ग्रहण ही केवळ खगोलीय घटना म्हणून पाहून सोडलं जात नाही. त्यासोबतीने काही धार्मिक रिती-रिवाज पाळले जातात. मग जाणून घ्या 16 मेचं चंद्रग्रहण भारतातून दिसणार का? ग्रहणाची वेळ काय असेल? वेध पाळावे लागणार का?

16 मे चं चंद्रग्रहण कुठून दिसणार?

16 मेचं यंदाच्या वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण भारता मधून दिसणार नाही. हे ग्रहण प्रामुख्याने दक्षिण-पश्चिमी यूरोप, आशिया, अफ्रीका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, प्रशांत महासागर, हिंद महासागर या भागात दिसणार आहे. दरम्यान भारतात ग्रहण दिसणार नसल्याने त्याच्याशी निगडीत नियम, वेध, सुतककाळ भारतीयांसाठी लागू नसेल.

चंद्रग्रहणाची वेळ

16 मेचं चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार, 16 मे च्या सकाळी 8 वाजून 59 मिनिटांनी सुरू होणार असून सकाळी 10 वाजून 23 मिनिटांपर्यंत असणार आहे. पण हे भारतात थेट डोळ्यांनी पाहता येणार नाही. हे नक्की वाचा: Eclipse 2022: यंदाच्या वर्षी कधी लागणार सूर्य आणि चंद्र ग्रहण? तारखा घ्या जाणून .

भारतीयांना हे चंद्रग्रहण ऑनलाईन विविध माध्यमांवर पाहता येणार आहे. नासा कडून युट्युब, ट्वीटर वर त्याचं खास ऑनलाईन स्ट्रिमिंग केले जाईल ते पाहून हा नजारा अनुभवता येणार आहे.

दरम्यान जेव्हा पृथ्वी ही सूर्य व चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण होते.