Beaver Moon | (Photo Credits: Pixabay)

आज त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी यंदाच्या 2024 च्या वर्षातील शेवटचा सूपरमून पहायला मिळणार आहे. ऑगस्ट महिन्यात ब्लू मून, सप्टेंबर महिन्यात हार्वेस्ट मून आणि ऑक्टोबर महिन्यात हंटर मून नंतर आता नोव्हेंबर महिन्यात Beaver Full Moon आहे. आजचं चंद्राचं रूप थोडं खास असणार आहे. जेव्हा पौर्णिमेच्या दिवशी चंद्र त्याच्या कक्षेत पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो तेव्हा सुपरमून होतो. यामुळे चंद्र थोडा मोठा आणि अधिक तजेलदार दिसतो. आजचा चंद्र Beaver Full Moon म्हणून ओळखला जाणार आहे. कारण हीच वेळ आहे जेव्हा बीव्हर त्यांच्या घरी परतून हिवाळ्याची तयारी करतात. 2024 च्या शेवटच्या सुपरमूनबद्दल तुम्हाला काय माहित असणे आवश्यक आहे ते येथे आहे.

2024 चा शेवटचा सूपरमून कधी?

2024 चा शेवटचा सूपरमून हा आज 15 नोव्हेंबर दिवशी दिसणार आहे.

2024 च्या शेवटच्या सूपर मूनची वेळ काय?

आज चंद्रोदय मुंबई मध्ये 17.28 ला होणार आहे. आजची पौर्णिमा भारतामध्ये पहाटे 6.19 ला सुरू होणार असून समाप्ती उत्तर रात्री 2.58 ला होणार आहे.

आजच्या सूपरमूनला का म्हणतात?

संपूर्ण वर्षभर पूर्ण चंद्र असलेल्या दिवसांना विविध नावे दिली जातात जी निसर्गात काय घडत आहे याची माहिती देत असतात. दरम्यान नोव्हेंबरच्या पौर्णिमेला बीव्हर मून म्हटले जाते, कारण बीव्हर विशेषत: वर्षाच्या या वेळी सक्रिय असतात आणि पुढील हिवाळ्याच्या महिन्यांसाठी तयारी करत असतात. असा समज आहे की मूळ अमेरिकन जमाती दलदल गोठण्याआधी बीव्हर सापळे लावतात, ज्यामुळे हिवाळ्यातील उबदार फर मिळते.

त्रिपुरारी पौर्णिमेला ‘ त्रिपुरी पौर्णिमा ‘ असेही म्हटले जाते. या दिवशी भगवान शंकराने त्रैलोक्याला त्रास देत असलेल्या त्रिपुर राक्षसाची तीन पुरे जाळून त्याला ठार केले म्हणून या पौर्णिमेला त्रिपुरी किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात.