Samsung Galaxy M31s स्मार्टफोनमध्ये युजर्सला मिळणार धमाकेदार फिचर्स; 19,499 रुपयांत खरेदी करता येणार
Samsung Galaxy M31s (Photo Credits-Twitter)

दक्षिण कोरियाची स्मार्टफोन निर्माती कंपनी सॅमसंग यांनी त्यांच्या M सीरिज मधील आणखी एक आणि दमदार स्मार्टफोन Galaxy M31s आज लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने युजर्सला खरेदी करण्यासाठी ई-कॉमर्स बेवसाईट Amazon India येथे उपलब्ध करुन दिला आहे. Galaxy M31 आणि Galaxy M21 नंतर हा या सीरिजमधील तिसरा स्मार्टफोन असून तो भारतात लॉन्च करण्यात आला आहे. सॅमसंगने या नव्या Galaxy M31s स्मार्टफोनसाठी कंपनीने दमदार 6,000mAh बॅटरी सह दमदार कॅमेरा फिचर्स ही दिले आहेत. फोन दोन रंगात उपलब्ध होणार असून स्टोरेजसाठी सुद्धा दोन ऑप्शन दिले आहेत.  फोनचा लुक Samsung Galaxy A51 सारखाच आहे.

Samsung Galaxy M31s  हा स्मार्टफोन कंपनीने दोन स्टोरेज म्हणजेच 6GB RAM+126GB आणि 6GB RAM+256GB मध्ये लॉन्च केला आहे. याच्या बेस मॉडेलची किंमत 19,499 रुपये आहे. तर हाय अॅन्ड वेरियंटची किंमत 21,499 रुपये आहे. हा स्मार्टफोन 6 ऑगस्टपासून ई-कॉमर्स वेबसाईट Amazon India सह Samsung च्या ऑफलाइन आणि ऑनलाईन स्टोर्समधून खरेदी करता येणार आहे. फोन दोन रंगात म्हणजेच Mirage Blue आणि Mirage Black मध्ये उपलब्ध होणार आहे.(India bans Chinese Apps: TikTok सह 59 अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर PUBG सुद्धा होणार बॅन? भारत सरकारच्या रडारवर 275 चिनी अ‍ॅप)

स्मार्टफोनच्या फिचर्सबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस Infinity-O- Super AMOLED डिस्प्ले पॅनलसह येणार आहे. फोनमध्ये सेंट्रली अलाइंड पंच होल दिला असून ज्यामध्ये सेल्फी कॅमेऱ्यात फिट केला आहे. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 दिला आहे. तसेच क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनच्या प्रोसेसर बाबत बोलायचे झाल्यास तो Exynos 9611 Soc वर काम करतो. जो 8GB पर्यंतच्या RAM ला सपोर्ट करतो.(Samsung Galaxy Z Flip 5G लॉन्च, 7 ऑगस्टपासून सेलसाठी होणार उपलब्ध)

फोनची इंटरनल मेमरी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512GB पर्यंत वाढवता येणार आहे. फोनमध्ये ट्रिपल कार्ड स्लॉट देण्यात आले आहे. तसेच ड्युअल 4GB सिम कार्ड सपोर्ट मिळणार आहे. यामध्ये VoLITE आणि Wifi Calling सारखे फिचर्स दिले आहेत. तसेच ऑडिओ इन्हांसमेंटसाठी डॉल्बी एटमस सपोर्ट दिला आहे. स्मार्टफोनमध्ये 6,0000mAh ची दमदार बॅटरी आणि USB Type C चार्जिंग फिचर 25W चे फास्ट चार्जिंग दिले जाणार आहे. फोनमध्ये सिक्युरिटीसाठी फेस अनलॉकसह साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. जे पॉवर बटणसह इंटिग्रेट केला आहे.