Samsung Galaxy Z Flip 5G लॉन्च, 7 ऑगस्टपासून सेलसाठी होणार उपलब्ध
Samsung Galaxy Z Flip 5G (Photo Credits-Twitter)

Samsung पुढील महिन्यात 5 ऑगस्टला Galaxy Unpacked इवेंटचे आयोजन करणार आहे. या इवेंटमध्ये कंपनी नवे डिवाइसेस बाजारात उपलब्ध करुन देणार आहे. असे बोलले जात होते की, कंपनी या इवेंटमध्ये Galaxy Z Flip 5G आणि Galaxy Note 20 लॉन्च करणार आहे. परंतु सॅमसंगच्या या इवेंट पूर्वीच त्यांनी Galaxy Z Flip 5G अधिकृतरित्या लॉन्च केला आहे. परंतु या स्मार्टफोनच्या किंमती आणि उपलब्धतेबाबत अधिक खुलासा केलेला नाही.  कंपनीने प्रथमच त्यांचा फोल्डेबल Galaxy Z Flip या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात लॉन्च केला होता. त्यानंतर आता याच्या 5G वेरियंटबाबत घोषणा करण्यात आली आहे.

Samsung Galaxy Z Flip 5G हा स्मार्टफोन काही निवडक मार्केटमध्ये  7 ऑगस्टपासून सेलसाठी उपलब्ध केला जाणार आहे. स्मार्टफोन मिस्टिक ब्रोंज आणि मिस्टिक ग्रे कलरच्या वेरियंटमध्ये उपलब्ध होणार आहे. युजर्सला स्मार्टफोन AT&T, Best Buy, Samsung.com, T-Mobile आणि Amazon.com येथून खरेदी करता येणार आहे. याची किंमत $1,499.99 म्हणजेच 1,11,900 रुपये आहे. जो एलटीई वर्जनच्या तुलनेत अधिक आहे.  एलटीई वर्जन भारतात 1,08,99 रुपये आहे. (Samsung Galaxy M01s स्मार्टफोन 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लॉन्च, जाणून घ्या फिचर्स)

Samsung Galaxy Z Flip 5G  मध्ये Qualcomm Snapdragon 865+ चिपसेटवर उतरवण्यात येणार आहे. चिपसेट आणि 5G सपोर्ट व्यतिरिक्त याच्या फिचर्समध्ये बदल करण्यात आलेला नाही. या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी प्लस डायनेमिक एमोलेड डिस्प्ले दिला आहे. जो फोल्ड केल्यानंतर 1.1 इंचाचा होतो. यामध्ये 8GB रॅम आणि 256GB इन-बिल्ट स्टोरेज दिला आहे. (Samsung कंपनीचा 'हा' फ्रिज खरेदी केल्यास ग्राहकांना 39 हजार रुपयांचा स्मार्टफोन मिळणार फ्री, जाणून घ्या ऑफर)

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy Z Flip 5G मध्ये 12MP चा प्रायमरी सेंसर आणि 12MP चा अल्ट्रा वाइड अँगल दिला आहे. तसेच सेल्फीसाठी 10MP फ्रंट कॅमेरा युजर्सला मिळणार आहे. पॉवर बॅकअपसाठी  या स्मार्टफोनमध्ये 3,300mAh ची बॅटी दिली आहे. अन्य फिचर्सबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये nano-SIM + e-SIM सपोर्ट, फिंगरप्रिंट सेंसर आणि ब्लूटूथ 5.0 दिला जाणार आहे.