Samsung कंपनीचा F62 स्मार्टफोन येत्या 15 फेब्रुवारीला होणार लॉन्च, जाणून घ्या खासियत
Samsung Galaxy F62 (Photo Credits-Twitter)

सॅमसंग (Samsung)  कंपनीने त्यांचा पुढील मिड सेगमेंट मधील स्मार्टफोन Galaxy F62 च्या लॉन्चिंगची घोषणा केली आहे. तर येत्या 15 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता कंपनीकडून हा स्मार्टफोन लॉन्च केला जाणार आहे. फोन ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart वर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच अॅमेझॉनवर एक वेगळी मायक्रो वेबसाइट सुद्धा बनवण्यात आली आहे. Samsung Galaxy F सीरिज मधील लॉन्च होणारा हा पहिला आणि सीरिजचा दुसरा स्मार्टफोन आहे. सॅमसंग गॅलेक्सी एफ सीरिज मधील पहिला फोन Galaxy F41 होता. जो गेल्या वर्षात ऑक्टोंबर महिन्यात लॉन्च करण्यात आला होता.(Samsung चा फोल्डेबल फोन Galaxy Z Flip3 आणि Galaxy Z Fold 3 लवकरचं लाँच होणार; जाणून घ्या खास स्पेसिफिकेशन्स)

परंतु कंपनीचा नवा स्मार्टफोन गॅलेक्सी एफ62 स्मार्टफोन Exynos 9825 प्रोसेसरसह उतरवला जाणार आहे. जो 7 नॅनोमीटर प्रोसेस टेक्नॉलॉजीसह येणार आहे. तसेच फोनच्या लॉन्चिंग डिटेलसाठी फ्लिपकार्टकडून एक मायक्रो वेबसाइट बनवण्यात आली आहे. Galaxy F61 स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह येणार आहे. तसेच फोनमध्ये इन्फिनिटिव्ह O डिस्प्ले डिझाइन दिला गेला आहे. पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 7000mAh ची मोठी बॅटरी मिळणार आहे. त्याचसोबत सेल्फीसाठी युजर्सला फ्रंट पॅनलवर पंच होल कट आउट डिझाइन दिले गेले आहे. लीक झालेल्या रिपोर्ट नुसार, कंपनीच्या या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरियंटमध्ये येणार आहे. Android11 बेस्ट आउट ऑफ द बॉक्सवर काम करणार असून ग्रीन आणि ब्लू रंगात उपलब्ध होणार आहे.(Samsung Galaxy M12 स्मार्टफोन क्वॉड रियर कॅमरा सेटअप आणि 6000mAh बॅटरीसह लाँच; जाणून घ्या खास स्पेसिफिकेशन्स)

तर Samsung Galaxy F41 ची सुरुवाती किंमत 16,999 रुपये आहे. याच्या टॉप वेरियंटची किंमत 17,999 रुपये ठेवण्यात आली आहे. फोन अॅन्ड्रॉइड 10 ओएस वर काम करणार असून Exyons 9611 चिपसेटवर उतरवला आहे. यामध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर एमोलेड Infinity-U डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप ही दिला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 64MP चा असून यामध्ये 8MP चा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 5MP चा तिसरा सेंसर ही दिला आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. यामध्ये पॉवर बॅकअपसाठी 6,000mAh ची दमदार बॅटरी दिली आहे.