
सॅमसंग Galaxy Z Flip3 आणि Galaxy Z Fold3 सुरू करण्यासाठी तयारी सुरू आहे. कंपनी या वर्षाच्या उत्तरार्धात हा फोन जागतिक स्तरावर बाजारात आणू शकते. टिप्सटर Ice Universe च्या अहवालानुसार, फोन लाँच होण्यास किमान पाच महिने लागू शकतात. Galaxy Z Flip3 स्मार्टफोन S Pen सपोर्टसह दिला जाऊ शकतो. याच दरम्यान, Galaxy Z Flip3 स्मार्टफोन लॉन्च होईल. Galaxy Z Flip3 कंपनीचा पूर्ण फ्लॅगशिप स्मार्टफोन नसेल. मात्र, Galaxy Z Fold3 हा कंपनीचा बजेट फ्लॅगशिप स्मार्टफोन असेल. (वाचा - Selfi प्रेमींसाठी 32MP चा कॅमेरा असलेले 'हे' आहेत जबरदस्त स्मार्टफोन्स)
स्पेसिफिकेशन्स -
सॅमसंग यावर्षी तीन प्रकारचे फोल्डेबल स्मार्टफोन मॉडेल लॉन्च करण्याची तयारी करत आहे. OLED रिसर्च फर्म UBI रिसर्चच्या म्हणण्यानुसार, सॅमसंगद्वारे लॉन्च करण्यात येणाऱ्या स्मार्टफोनमध्ये Galaxy Z Flip 2, Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Fold Lite स्मार्टफोनचा समावेश आहे. या सर्व मॉडेल्समध्ये अल्ट्रा थिन ग्लास कव्हर विंडो म्हणून वापरली गेली आहे. Galaxy Z Flip 2 मध्ये 6.7 इंचाची अंतर्गत स्क्रीन आणि 3 इंचाची बाह्य स्क्रीन असू शकते. फोनची अंतर्गत स्क्रीन आकार पूर्वीच्या Galaxy Z Flip फोनप्रमाणे असेल. परंतु, बाह्य स्क्रीन आकार वाढविला गेला आहे. जुन्या फ्लिप फोनपेक्षा त्याचा स्क्रीन आकार 1.1 इंच मोठा असेल. Samsung Galaxy Z Fold Lite ला पूर्वीसारखीचं स्क्रीन दिली जाईल. तसेच काही लीक झालेल्या अहवालात असा दावा केला आहे की, फोन अंडर डिस्प्ले कॅमेर्यासह दिला जाऊ शकतो.
The Z Flip ची नवीन आवृत्ती 6.7 इंचाच्या फोल्डेबल पॅनेलसह येईल. परंतु, यात जुन्या झेड फ्लिपपेक्षा 3 इंचाचा एक्सटर्नल डिस्प्ले मिळेल. Galaxy Z Fold2 मध्ये 6.2 इंचाचे कव्हर स्क्रीन आणि 7.6 इंचाची मुख्य स्क्रीन आहे. Galaxy Z Fold2 स्मार्टफोन Samsung चा तिसरा फोल्डेबल स्मार्टफोन असेल. यापूर्वी कंपनीने Galaxy Fold आणि Galaxy Z Flip स्मार्टफोन लाँच केला आहे.