जिओ (Photo Credit: PTI)

सध्याच्या इंटरनेट सेवांमध्ये आघाडीवर असलेल्या रिलायन्स जिओ (Reliance Jio) कंपनी लवकरच त्यांचा मोठी स्क्रीन असलेला स्मार्टफोन बाजारात घेऊन येत आहे. तसेच जिओचा हा स्मार्टफोन मोठ्या खिशाला परवडणारा असणार आहे.

जिओचा येणारा स्मार्टफोन हा 4G स्वरुपात असणार आहे. तर स्मार्टफोनमध्ये उत्तम कनेक्टिव्हिटी आणि नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. तसेच मोठी स्क्रिन असणारा हा स्मार्टफोन रिलायन्स कंपनी त्यांच्या भागीदारांसोबत मिळून काम करत आहेत.

रिलायन्स जिओ Apple, Samsung,Xiaomi आणि Oppo सारख्या बड्या कंपन्यांसोबत ही काम करते. तसेच भागीदार हिस्सामधील रिलायन्स हा प्रथम स्मार्टफोन असणार असून ग्राहकांसाठी फोनची किंमत कमी करण्याची ऑफर्स येत आहे.