Reliance Jio | ( File Edited Image Used For Representational purpose Only)

भारतीय टेलिकॉम क्षेत्रातील सर्वात मोठी खासगी दूरसंचार ऑपरेटर (India’s largest Telecom Operator) रिलायन्स जिओ (Reliance Jio) आपला सर्वात स्वस्तातील ब्रॉडबँड प्लान घेऊन आली आहे. रिलायन्स जओ द्वारे नुकतीच या प्लानची घोषणा करण्यात आली. या घोषणेनुसार प्रतिमहिना अवख्या 198 रुपयांमध्ये ग्राहकांना चक्क 10 MBPS स्पीड आणि अनलिमिटेड डाटा उपलब्ध होणार आहे. शिवाय या प्लानमध्ये 6 ओटीटी (OTT) फ्लॅटफॉर्मही मिळणार आहेत.

रिलायन्स जिओ द्वारा इतरही काही प्लान लॉन्च करण्यात आले आहेत. तर काही जुन्या प्लानमध्येही सुधारीत दर लागू केले आहेत. ज्यामध्ये 198 रुपयांपासून ते 1499 रुपयांपर्यंतच्या योजना आहेत. बहुतेक योजना OTT अॅप्स आणि लाइव्ह टीव्ही चॅनेलसह (TV channels) एकत्रित आहेत. (हेही वाचा, WhatsApp Audio Chats: Android वरील व्हॉट्सअ‍ॅप युजर्सना मिळणार आता Real-Time Audio Visualisation चं फीचर)

नवीन प्लानची वैषिष्ट्ये

  • नवीन प्लॅन प्रति महिना फक्त 198 रुपयांत उपलब्ध असेल
  • या प्लानमध्ये 10 MBPS स्पीड आणि अमर्यादित डेटा मिळेल
  • प्लॅनमध्ये 6 OTT प्लॅटफॉर्म मोफत उपलब्ध असतील

ट्विट

नवे प्लान बाजारात उतरवून अधिकाधिक ग्राहक आपल्याकडे खेचायचा जिओचा विचार आहे. सांगितले जात आहे की, जिओकडे 4.5 कोटींहून अधिक केबल वापरकर्ते आणि 6.5 कोटींहून अधिक DTH वापरकर्ते आहेत, जे दरमहा सरासरी 150 ते 200 रुपये खर्च करतात.