Meta च्या मालकीचं WhatsApp या प्रसिद्ध मेसेजिंग अॅप कडून आता नव्या फीचरची चाचणी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. हे फीचर ऑडिओ चॅट्स (Audio Chat) आहे. WABetaInfo,च्या माहितीनुसार, संभाषणासाठी हे नवं फीचर लवकरच Android वर दिसण्याची शक्यता आहे. यामुळे युजर्सना ऑडिओ चॅट्स हेडर मिळणार आहेत.
मीडीया रिपोर्ट्सनुसार, रिअल टाईम ऑडिओ व्हिज्युलायझेशन च्या माध्यमातून चॅट हेडरच्या वर काही जागा राखीव असेल तेथे हा ऑडिओ चॅट्स चा पर्याय दिसणार आहे. युजर्सना त्यांच्या संभाषणादरम्यान audio waveforms पाहता देखील येणार आहेत. अद्याप याबाबतचे अधिक अपडेट्स समोर आलेले नाहीत. ज्याद्वारे समजू शकेल की नेमकं हे फीचर काम कसं करेल. अजूनही या फीचरमध्ये डेव्हलपमेंट सुरू आहे.
मेटा कडून नवं व्हॉट्सअॅप अॅप्लिकेशन विंडोज साठी जारी करण्यात आलं आहे. त्यामध्ये मोबाईल व्हर्जन प्रमाणे इंटरफेस देण्यात आलं आहे. युजर्स आता ग्रुप व्हिडिओ कॉल्स 8 जणांसोबत तर ऑडिओ कॉल्स 32 जणांसोबत करू शकतात.
व्हॉट्सअॅप कडून डिव्हाईस लिंकिंगची प्रक्रिया वेगवान करण्यात आली आहे. त्यामध्ये सिंकिंग चांगल्या प्रकारे करता येईल यासाठी सोय केली आहे. तसेच लिंक प्रिव्ह्यू आणि स्टिकर्स सारखी फीचर्स वाढवण्यात आली आहेत.