Redmi Note 10S (Photo Credits-Twitter)

Xiaomi चा सब ब्रँन्ड Redmi चा नवा स्मार्टफोन Redmi Note 10S च्या लॉन्चिंग बद्दल आता खुलासा करण्यात आला आहे. येत्या 13 मे रोजी दुपारी 12 वाजता हा स्मार्टफोन लॉन्च केला जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. रेडमी नोट 10एस स्मार्टफोनच्या लॉन्चिंगचा इव्हेंट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म YouTube आणि Mi.com वर पाहता येणार आहे. फोनचा स्टनिंग कॅमेरा आणि शानदार परफॉर्मेन्स मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. Xiaomi कडून अधिकृत ट्विटर अकाउंटवर त्या संबंधित खुलासा केला आहे.(Redmi Raining 9s on Flipkart: रेडमीच्या 9 सीरिजच्या 'या' स्मार्टफोन्सची 2 ते 7 मे दरम्यान फ्लिपकार्टवर होणार बरसात, वाचा सविस्तर)

यापूर्वी शाओमीकडून रेडमी नोट 10एस च्या रिटेल बॉक्सचा फोटो झळकवण्यात आला होता. अपकमिंग स्मार्टफोन रेडमी नोट 10एस चा टीझर अधिकृत ट्विटर अकाउंटवर पोस्ट केला होता. तर फोनमध्ये एक 64MP चा मुख्य कॅमेरा दिला जाणार आहे. रेडमी नोट 10एस स्मार्टफोन तीन कलर ऑप्शन ब्लू, डार्क ग्रे आणि व्हाइट रंगात येणार आहे. हा एक गेमिंग सेंट्रिक स्मार्टफोन असणार असून जो हाय रेज्यॉल्यूश सपोर्टसह येणार आहे. तसेच गेल्या महिन्यातच हा फोन ग्लोबली लॉन्च करण्यात आला आहे. भारतात रेडमी नोट 10एस तीन स्टोरेज वेरियंट 6GB+64GB, ^GB+128GB आणि 8GB+128GB मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो.(Vivo V21 5G भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन)

Tweet:

स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास तो ग्लोबली अॅन्ड्रॉइड11 आधारित MIUI 12.5 सह लॉन्च केला आहे. यामध्ये एक 6.43 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले सपोर्ट दिला जाणार आहे. याचे रेज्यॉल्यूशन 1080X2400 पिक्सल आहे. फोनमध्ये सुपर एमोलेड पंच होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो. फोन MediaTek Helio G95 SoC प्रोसेसरला सपोर्ट करणार आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एक क्वाड कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 64MP चा आहे. या व्यतिरिक्त 8MP चा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 2MP ची मॅक्रो लेन्स सपोर्ट मिळणार आहे. फोनमध्ये मॅक्रो फोटोग्राफीसाठी 2MP डेप्थ कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो. Redmi Note 10S स्मार्टफोन 13MP सेल्फी कॅमेऱ्यासह येणार आहे. फोनला साइड माउंडेट फिंगरप्रिंट सेंसरचा सपोर्ट दिला गेला आहे. त्याचसोबत AI फेस अनलॉक सुद्धा सपोर्ट मिळणार आहे.