Vivo V21 5G भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत, फिचर्स आणि स्पेसिफिकेशन
Vivo V21 5G Smartphone Launched in India (Photo Credits: Vivo)

वीवो इंडियाने (Vivo India) नवा स्मार्टफोन V21 5G बाजारात लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन दोन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहेत- 8GB + 128GB आणि 8GB + 256GB. 6 मे 2021 पासून या स्मार्टफोनचा सेल फ्लिपकार्ट आणि अधिकृत वेबसाईटवर सुरु होईल. या स्मार्टफोनची प्री-बुकींग सुरु झाली आहे. या स्मार्टफोनमध्ये 44MP चा फ्रंट कॅमेरा OIS सपोर्ट सह दिला आहे. MediaTek Dimensity 800U SoC प्रोसेसर आहे. 4,000mAh ची बॅटरी आणि 90Hz AMOLED display देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Dusk Blue, Sunset Dazzle आणि Arctic White या तीन रंगात उपलब्ध आहे.

या स्मार्टफोनचा 8GB + 128GB वेरिएंट 29,990 रुपयांत तर 8GB + 256GB  वेरिएंट 32,990 रुपयांत उपलब्ध असेल. लॉन्च ऑफर दरम्यान हा स्मार्टफोन एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवरुन खरेदी केल्यास 2500 रुपयांचा डिस्काऊंट मिळेल. त्यासोबत एक्सचेंज ऑफरवर 3000 रुपयांची सूट मिळेल. तसंच नो-कॉस्ट ईएमआय 12 महिने आणि त्याहून अधिक कालावधीसाठी मिळेल.

Vivo India Tweet:

या फोनमध्ये 6.44 इंचाचा  FHD+ AMOLED डिस्प्ले 90Hz  रिफ्रेश रेट आणि  2404×1080 पिक्सल रिजोल्यूशन सह देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 64 MP चा प्रायमरी लेन्स OIS सपोर्ट सह देण्यात आला आहे. त्यासोबत 8MP चा वाईल्ड अँगल लेन्स आणि 2MP चा मायक्रो लेन्स कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 44MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन Android 11 वर आधारीत FunTouch OS 11.1 या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. या मोबाईलमध्ये 4000 mAh बॅटरी दिली असून 33W चा फास्ट चार्गिंग सपोर्ट देण्यात आला आहे.