Realme Narzo 50 येत्या 24 फेब्रुवारीला होणार लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह किंमतीबद्दल अधिक
Realme Narzo Series (Photo Credits-Twitter)

Realme चा नवीन बजेट स्मार्टफोन Realme Narzo 50 24 फेब्रुवारी 2022 ला लॉन्च होईल. Realme Narzo 50 लाँचसाठी Amazon India वर लिस्ट करण्यात आला आहे. फोनची विक्री Amazon India कडून होणार आहे. Realme Narzo 50A स्मार्टफोन MediaTek Helio G96 चिपसेट सपोर्टसह सादर केला जाऊ शकतो. उच्च रिफ्रेश रेट सपोर्ट आणि मोठ्या बॅटरीसह फोनमध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो.(Realme 9 Pro 5G आणि Realme 9 Pro+ 5G आज होणार भारतात लाँच; 'अशी' पाहू शकता लाईव्ह स्ट्रीमिंग, जाणून घ्या संभाव्य किंमत)

Realme Nazro 50 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले सपोर्ट आहे. फोनला हाय रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. फोनला पंच-होल सपोर्ट दिला जाईल. Realme Narzo 50 स्मार्टफोनमध्ये Helio G96 चिपसेट दिला जाऊ शकतो. फोन दोन स्टोरेज 4GB आणि 6GB रॅम सपोर्टसह देऊ शकतो. तर 64 GB आणि 128 GB इंटरनल स्टोरेज सपोर्ट देण्यात आला आहे.(नवा Redmi 10 स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह स्पेसिफिकेशनबद्दल अधिक)

EEC लिस्टिंगनुसार, Realme Narzo 50 स्मार्टफोनमध्ये 4,800mAh बॅटरी सपोर्ट देण्यात आला आहे. फोन 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. हा फोन Android 11 आधारित RealmeUI 3.0 सपोर्टसह येईल. Realme Narzo 50 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येईल. फोनमध्ये मुख्य कॅमेरा म्हणून 50MP प्राथमिक कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच 2MP डेप्थ सेन्सर आणि मायक्रो सेन्सर सपोर्ट दिला जाऊ शकतो. फोनमध्ये सेल्फीसाठी 16MP सेंसर सपोर्ट दिला जाईल.

Realme Narzo 50 4 GB RAM आणि 64 GB स्मार्टफोनचा बेस व्हेरिएंट 15,990 रुपयांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. तर Realme Narzo 50 चा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट 17,999 रुपयांना ऑफर केला जाऊ शकतो. Realme Narzo 50 स्मार्टफोन ग्रे आणि ग्रीन या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल.