Redmi (PC - Twitter)

शाओमीचा सब ब्रँन्ड Redmi चा नवा रेडमी 10 2022 स्मार्टफोन ग्लोबल मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या मिड-रेंज स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेस्ड रेट सपोर्ट दिला गेला आहे. तसेच फोटोग्राफीसाठी 50 मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. या व्यतिरिक्त मोठी बॅटरी आणि Helio G- सीरिज चिपसेटचा वापर करण्यात आला आहे.(अवघ्या 26 हजारांमध्ये Apple iPhone 12 Mini खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या ऑफर बद्दल अधिक)

Redmi 10 2022 एक लाइटवेट स्मार्टफोन आहे. फोनचे वजन 181 ग्रॅम आहे. तसेच डायमेंन्शन 161. 95 mm/75.53mm आणि 8.92mm आहे. रेडमी 10 2022 स्मार्टफोनमध्ये एक 6.5 इंचाचा पंचहोल डिस्प्ले दिला गेला आहे. फोन फुल एचडी प्लस रेजॉल्यूशनसह येणार आहे. फोनमध्ये एक 90Hz रिफ्रेस्ड रेट सपोर्ट दिला गेला आहे. फोनमध्ये 405 ppi पिक्सल डेंसिटी दिला गेला आहे. स्क्रिन प्रोटेक्शनसाठी फोनमध्ये गोरिल्ला ग्लास 3 चा वापर केला आहे. स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल अधिक माहिती देण्यात आलेली नाही. तसेच फोन तीन कलर ऑप्शन कार्बन ग्रे, पॉबेल व्हाइट आणि सी ब्लू रंगात येणार आहे.(Asus कंपनीकडून 15 फेब्रुवारीला लॉन्च करणार नवे धमाकेदार स्मार्टफोन, जाणून घ्या अधिक)

रेडमी 10 2022 स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली गेली आहे. फोन 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येणार आहे. तसेच 9W रिवर्स चार्जिंग सपोर्ट दिला गेला आहे. रिटेल पॅकेजमध्ये डिवाइस 22.5W चार्जर सपोर्टसह येणार आहे. फोनमध्ये फेस अनलक आणि एक साइड फिंगरप्रिंट स्कॅनर दिला गेला आहे. डिवाइस डेडिकेट मायक्रो एसडी कार्ड स्लॉट, वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, जीपीएस, एनएफसी आणि युएसबी- सी पोर्ट दिला गेला आहे. फोनमध्ये ड्युअल स्पीकर्स, 3.5mm ऑडिओ जॅक दिला गेला आहे.