अवघ्या 26 हजारांमध्ये Apple iPhone 12 Mini खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या ऑफर बद्दल अधिक
iPhone (Photo Credits-Twitter)

तुम्हाला जर आयफोन 12 मिनी खरेदी करायचा असेल तर ही तुमच्याकडे उत्तम संधी असणार आहे. कारण ई-कॉमर्स वेबसाइटवर Apple iPhone 12 Mini वर जवळजवळ 33,900 रुपयांच्या डिस्काउंट दिला जात आहे. हा फोन फ्लिपकार्टवर मात्र 26 हजार रुपयांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. परंतु फोनची खरेदी किंमत 59,900 रुपये आहे. अशातच तुम्ही आता आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ऑफर बद्दल अधिक जाणून घ्या.(Tecno Pova 5G स्मार्टफोन भारतात लाँच; किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या)

Apple iPhone 12 Mini स्मार्टफोन 64 जीबी वेरियंटवर 29 टक्के डिस्काउंटसह फ्लिपकार्टवर 42,299 रुपयांत विक्रीसाठी उपलब्ध आहे. Citi बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या खरेदीवर 10 टक्क्यांना अधिक म्हणजेच 750 रुपयांचा डिस्काउंट दिला जाणार आहे. तसेच 100 रुपयांचा कॅशबॅक ही मिळणार आहे. तर एक्सचेंज ऑफरमध्ये 15,500 रुपयांची सूट दिली जाणार आहे. अशाप्रकारे आयफोन 12 मिनी स्मार्टफोनची किंमत 26 हजारांपेक्षा कमी होते. ऐवढेच नव्हे तर ग्राहकांना 26 हजार रुपयांच्या किंमतीत 1466 रुपयांचा प्रति महिना EMI सुद्धा देता येणार आहे. आयफोन 12 मिनी स्मार्टफोनवर एका वर्षाची वॉरंटी सुद्धा मिळणार आहे.

iphone 12 Mini स्मार्टफोनमध्ये एक 5.4 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्लेसह दिला गेला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 12 मेगापिक्सल आणि 12 मेगापिक्सल असे दोन कॅमेरे दिले गेले आहेत. तसेच 12 मेगापिक्सलचा फ्रंट सेल्फी कॅमेरा आहे. आयफोन 12 मिनी स्मार्टफोन A14 Bionic चिपसेटवर आधारित आहे. तसेच सिरॅमिक शील्डसह येणार आहे. फोन इंडस्ट्री लीडिंग IP68 वॉटर रेजिस्टेंट प्रोटेक्शनसह येणार आहे. फोनमध्ये नाइट मोड, 4K Dolby Vision HDR रेकॉर्डिंग दिला गेला आहे.