Realme 7 Pro चा आज Flipkart आणि Realme.com वर दुपारी 12 वाजल्यापासून ऑनलाईन सेल; इथे जाणून घ्या धमाकेदार ऑफर्स, किंमत, फीचर्स
Realme 7 Pro Online Sale (Photo Credits: Realme India)

रिअल मी  7 प्रो (Realme 7 Pro) चा सेल आजपासून भारतामध्ये सुरू झाला आहे. यंदा  सप्टेंबर महिन्याच्या सुरूवातीला Realme 7 सीरीजमध्ये हा मोबाईल लॉन्च झाला आहे. आता Flipkart आणि Realme.com वर दुपारी 12 वाजल्यापासून सेल द्वारा तो भारतीय ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. आजच्या सेलमध्ये या मोबाईलवर 1000 रूपयांची सूट, ICICI बॅंकेच्या क्रेडीट कार्ड्सवर थेट 5% सूट; Flipkart Axis Bank credit cards वर 5% अनलिमिटेड कॅशबॅक, Axis Bank Buzz credit cards वर 5% सूट सोबतच नो कॉस्ट इएमआय (No Cost EMI), स्टॅडर्ड ईएमआय (Standard EMI) अशा धमाकेदार ऑफर्स असतील. नक्की वाचा: Flipkart वर आज दुपारी 12 वाजता होणार Realme Narzo 20 पहिला फ्लॅश सेल, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

Realme 7 Pro हा स्मार्टफोन 6.4 इंच Super AMOLED फूल स्क्रीन FHD+ display सोबत 2400x1080 pixels रिझोल्युशनचा असेल. या फोनमध्ये quad rear camera system आहे. ज्यात 64MP में लेंस, 8MP ultra-wide-angle shooter, macro सेंसर आणि B&W portrait lens आहे. हा हॅन्डसेट 6GB RAM + 128GB storage आणि 8GB RAM + 128GB storage अशा दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. फोनची बॅटरी 4,500mAh आहे तर त्याला 65W SuperDart चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील आहे.

दरम्यान Realme 7 Pro हा स्मार्टफोन Android 10 या Realme UI ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. कनेक्टिव्हिटीसाठी 4G VoLTE, Wi-Fi 802.11 ac,Bluetooth v5.1, GPS/A-GPS/NavIC असेल तर युएसबी हा टाईप सी पोर्ट चा आहे. या फोनची किंमत पाहता ती 6GB RAM + 128GB चा हॅन्डसेटसाठी Rs 19,999 आहे. तर 8GB RAM + 128GB चा हॅन्डसेट 21,999 मध्ये उपलब्ध असेल.