Flipkart वर आज दुपारी 12 वाजता होणार Realme Narzo 20 पहिला फ्लॅश सेल, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये
Realme Narzo 20 (Photo Credits: Twitter/Realme)

भारतीय बाजारात अल्पावधी काळात चांगलाच जम बसवलेली स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme ने रियलमी नार्जो सिरीजचे (Realme Narzo Series) स्मार्टफोन्स नुकतेच भारतात लाँच केले. त्यातील Realme Narzo 20 या स्मार्टफोनचा पहिला फ्लॅश सेल आज ऑनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर (Flipkart) होणार आहे. जबरदस्त कॅमेरा (Camera Feature) आणि बॅटरी लाईफ (Battery Life) असलेला हा स्मार्टफोन दोन प्रकारात उपलब्ध आहे. यातील 4GB रॅम (RAM) आणि 64GB स्टोरेजची किंमत 10,499 रुपये तर 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजची किंमत 11,999 रुपये इतकी आहे.

हा स्मार्टफोन फ्लिपकार्टसह रियलमीची अधिकृत साईट Realme.com वर देखील विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. फ्लिपकार्टवरुन या स्मार्टफोनची खरेदी करणारे ग्राहक जर Flipkart Axis Bank Credit Card ने पेमेंट करणार असतील तर त्यांना 5 टक्क्यांचा कॅशबॅक मिळेल. तसेच 64GB स्टोरेज असलेल्या फोनवर 1167 रुपयांचा, तर 128GB स्टोरेजवर 1278 रुपयांचा नो कॉस्ट EMI वर खरेदी करु शकता. Realme Narzo 20 सीरीज भारतात झाले लाँच, 'या' दिवशी होणार पहिला सेल

पाहूयात Realme Narzo 20 ची खास वैशिष्ट्ये

प्रकार- 4GB+64GB=10,499 रुपये

4GB+128GB= 11, 999 रुपये

पहिला सेल- 28 सप्टेंबर

डिस्प्ले- 6.5 फुल एचडी+ कॉर्निंग गोरिला ग्लास

प्रोसेसर- MediaTek Helio G85 SoC चिपसेट

कॅमेरा-48MP+8MP+2MP+8MP

बॅटरी- 6000mAh (18W फास्ट चार्ज सपोर्ट)

काही दिवसांपूर्वीच Realme कंपनीने Realme Narzo 20 Series स्मार्टफोन्स भारतात लाँच केले. यात Realme Narzo 20, Realme Narzo 20 Pro आणि Realme Narzo 20A भारतात लाँच केले आहेत. यात Realme Narzo 20 मध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आणि 4GB+128GB स्टोरेज अशा दोन प्रकारांत लाँच केले आहे. या स्मार्टफोनची किंमत अनुक्रमे 10,499 आणि 11,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. तर Narzo 20A मध्ये 3GB+32GB स्टोरेज आणि 4GB+64GB स्टोरेज या वेरियंटमध्ये लाँच केले आहे. याची किंमत अनुक्रमे 8,499 रुपये आणि 9,499 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.