क्वाड रियर कॅमेऱ्यासह Realme 7 Pro भारतात लॉन्च, जाणुन घ्या किंमतीसह स्पेसिफिकेशन
Realme 7 Pro (Photo Credits-Twitter)

रिअलमीने (Realme) भारतीय बाजारात आज त्यांचा बहुप्रतिक्षित अशी Realme 7 सीरिज लॉन्च केली आहे. या सीरिज अंतर्गत कंपनीने Realme 7 आणि ईाोतसा 7 Pro हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. या सीरिजसह अन्य काही प्रोडक्ट्स सुद्धा भारतात उतरवण्यात आले आहेत. Realme 7 Pro बद्दल बोलायचे झाल्यास या स्मार्टफोनमध्ये ड्युअल स्टिरिओ स्पीकर्स आणि शानदार हार्डवेअर फिचर्सचा उपयोग केला आहे.(10MP कॅमेरा असणारा स्मार्टफोन Mi10 फ्लिपकार्टवर सेलसाठी उपलब्ध, जाणून घ्या फिचर्स)

Realme 7 Pro भारतात दोन स्टोरेज वेरियंटमध्ये लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनच्या 6GB+128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 19,999 रुपये आहे. तर 8GB+128GB स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत 21,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन मिरर ब्लू आणि मिरर व्हाइट रंगाच्या वेरियंटमध्ये उपलब्ध करुन दिला जाणार आहे. या उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास पहिल्यांदाच 14 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता सेलसाठी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. युजर्सला याच्या कंपनीच्या अधिकृत वेबसाईट्ससह ई-कॉमर्स वेबसाईट Flipkart येथून खरेदी करु शकतात.

रिअलमी 7 प्रो स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा सुपर एमोलेड डिस्प्ले दिला आहे. यासाठी स्क्रिन रेजोल्यूशन 1080X2400 पिक्सल आणि अस्पेक्ट रेश्यो 90.8 टक्के आहे. अॅन्ड्रॉइड 10OS वर आधारित हा स्मार्टफोन Octa-Core Qualcomm Snapdragon 720G प्रोसेसरवर काम करणार आहे. यामध्ये देण्यात आलेला स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट सुद्धा दिला आहे.(भारतीयांमध्ये स्मार्टफोन खरेदी करण्याच्या विचारसरणीत बदल, 'या' गोष्टी पाहून Buy केला जातोय नवा मोबाईल)

स्मार्टफोनमध्ये चार रियर कॅमेरे आणि सिंगल फ्रंट कॅमेरा मिळणार आहे. फोन मध्ये 48MP चा Sony IMX682 प्रायमरी सेंसर दिला जाणार आहे. तसेच 8MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 2MP चा मोनोक्रोम सेंसर आणि 2MP ची मॅक्रो लेन्स सुद्धा दिली जाणार आहे. तर फ्रंन्ट कॅमेरा 32MP चा असणार आहे. पॉवर बॅकअपसाठी यामध्ये 45000mAh ची बॅटरी दिली असून जी 65W सुपरडार्ट चार्ज फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानासह येते.