Realme आज सोमवारी (4 मार्च) भारतात आपला नवीन स्मार्टफोन Realme 3 लॉन्च करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 12nm प्रोसेस असणारा MediaTek Helio P70 प्रोसेसर देण्यात आला आहे. त्याचसोबच स्मार्टफोनच्या मागील बाजूस डुअल रिअस कॅमेरा सेटअप दिला आहे. Reale 3 लॉन्चिंगचा कार्यक्रम नवी दिल्ली मध्ये होणार आहे.
लॉन्चिंगपूर्वी य स्मार्टफोनसाठी फ्लिपकार्टवर एक मायक्रोसाईट बनवण्यात आली आहे. या साईटवर Realme 3 याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये 14nm स्नॅपड्रॅगन 660 प्रोसेसरला टक्कर देणार आहे. तसेच साईटवर वॉटर ड्रॉप स्टाईल डिस्प्ले नॉच दिसणार आहे.
Realme 3 मध्ये 4,230mAh बॅटरी देण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. ही बॅटरी Xiaomi च्या गेल्या आठवड्याच लॉन्च केलेल्या Redmi Note 7 पेक्षा जास्त आहे. या स्मार्टफोनमध्ये 4,000mAh बॅटरी दिली आहे.
त्याचसोबत डायमंड कट केस देण्यात आला आहे. v4.2 ब्लूटूथ सपोर्ट असण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनच्या किंमतीबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र 10,000 रुपयांच्या आतमध्ये या स्मार्टफोनची किंमत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर Redmi Note 7 ह्या स्मार्टफोनची किंमत 9,999 रुपयांचा आतमध्ये ठेवण्यात आली आहे.