पेटीएम पेमेंट्स बँकेवर (Paytm Payments Bank) 31 जानेवारी रोजी आरबीआयने मोठी कारवाई केली. यानंतर फास्टॅग, वॉलेट आणि इतर बँक अकाउंटमध्ये पैसे जमा करण्यावर देखील बंदी घातली गेली. आरबीआयने पेटीएमच्या बँकिंग सर्व्हिस (Paytm Banking Service) 29 फेब्रुवारीनंतर बंद होणार आहे. आरबीआयने नियामंचे उल्लघंन केल्याबद्दल ही निर्बंध लावण्यात आले आहेत. पेटीएम पेमेंट्स बँक आरबीआयने का कारवाई केली आता याची माहिती समोर आली आहे. (हेही वाचा - Action Against Paytm Payments Bank Ltd: पेटीएम पेमेंट्स बँकविरुद्ध RBI ची मोठी कारवाई; नवीन ग्राहक जोडण्यास बंदी)
पेटीएम पेमेंट्स बँकेवर बंदी घालण्यामागे एक प्रमुख कारण हे कुठलही ओळख न दाखवता कोट्यवधी अकाउंट बनवणे हे आहे. या अकाउंटची केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नव्हती. यामध्ये मनी लॉड्रिंग झाल्याचा संशय आहे. पेटीएम पेमेंट्स बँक अंतर्गत एकच पॅन कार्डशी तब्बल 1000 हून अधिक यूजर्सचे अकाउंट कनेक्ट करण्यात आले होते.
पेटीएम पेमेंट्स बँकेकडे तब्बल ३५ कोटी ई-वॉलेट आहेत. यामध्ये तब्बल ३१ कोटी अॅक्टिव्ह नाहीयेत, तर फक्त चार कोटी कोणच्याही अमाउंटशिवाय किंवा कमी अमाउंट सह सुरू आहेत. म्हणजेच मोठ्या संख्येने इनअॅक्टिव्ह अकाउंट आहेत. तसेच लाखो अकाउंटचे केवायसी अपडेट झालेले नाहीयेत.