PUBG Mobile India ने काही वेळातच Delete केला YouTube वर लॉन्च केलेला टीझर
PUBG Mobile India (Photo Credits: PUBG Mobile India)

पबजी मोबाईल इंडिया (PUBG Mobile India) लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये या रॉयल गेमचे टीझर समोर आले होते. पजबी मोबाईल (PUBG Mobile) या गेमला पर्याय म्हणून पबजी मोबाईल इंडिया या नवा गेम लॉन्च करण्यात येणार आहे. लॉन्च होण्यापूर्वीच गेमच्या अधिकृत युट्युब चॅनलवर (YouTube Channel) कंपनीने गेमच्या टीझरचा व्हिडिओ रिलीज केल्याचे एका रिपोर्टमधून समोर आले होते. मात्र त्यानंतर लगेचच हा व्हिडिओ चॅनलवरुन काढून टाकण्यात आला आहे. परंतु, काही युजर्सने या व्हिडिओचे स्क्रीनशॉर्ट काढून ठेवले आहेत.

रिपोर्टनुसार, गेमच्या लॉन्च डेटबद्दल या टीझरमध्ये काही सांगितलेले नाही. परंतु, गेम लवकरच लॉन्च होईल, असे लिहिले होते. पबजी मोबाईल इंडियाचा लॉन्च आता जास्त काळ दूर नाही, असेही या व्हिडिओत म्हटले होते. हा गेम भारतात रिलीज करण्यासाठी भारत सरकारने मान्यता दिल्याचे गेल्या महिन्यात एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले होते. (भारतामध्ये PUBG Mobile India पुन्हा लॉन्च होणार? मेकर्सनी सुरु केल्या हालचाली, Investment and Strategy Analyst पदासाठी होत आहे भरती)

PUBG Mobile India (Photo Credits: PUBG Mobile India)

पबजी मोबाईल इंडिया गेममध्ये काही नवीन मॉडिफिकेशन असण्याची शक्यता आहे. त्यासोबतच हिंसक वातावरण देखील कमी प्रमाणात दाखवण्यात येईल, असा अंदाज आहे. पबजी मोबाईलच्या तुलनेत पबजी मोबाईल इंडियामध्ये हिंसेचे प्रमाण कमी करण्यात आल्याचे गेमच्या डेव्हलपर्सनी सांगितले आहे. दरम्यान, पबजी प्रेमी आतुरतेने या गेमची वाट पाहत आहेत. त्याचबरोबर या गेममध्ये काय नवे असणार, याची उत्सुकता आता वाढली आहे.