भारतामध्ये PUBG Mobile India पुन्हा लॉन्च होणार? मेकर्सनी सुरु केल्या हालचाली, Investment and Strategy Analyst पदासाठी होत आहे भरती
PUBG (Photo Credits: PUBG)

भारतामध्ये एकेकाळी पबजी (PUBG) हा खेळ अतिशय लोकप्रिय होता. मात्र सरकारने या गेमवर बंदी घातली आहे. आता भारतात पबजी मोबाइल इंडिया (PUBG Mobile India) गेम लॉन्चच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांसाठी एक चांगली बातमी आहे. कदाचित हा गेम पुन्हा भारतामध्ये सुरु होऊ शकतो. पबजीच्या निर्मात्यांनी जॉब सर्च आणि इन्फॉरमेशन साइट लिंक्डइनवर (LinkedIn) एक पोस्ट टाकली आहे, ज्याद्वारे हे समजत आहे की ते Investment and Strategy Analyst नावाच्या पदासाठी हायरिंग करत आहेत. यामुळे अशी शक्यता वर्तविली जात आहे की, कदाचित पबजी मोबाइल गेमचे भारतीय व्हर्जन लवकरच सुरू केके जाऊ शकते.

ही पोस्ट म्हणजे कंपनीच्या विस्ताराची योजना आहे, त्यामुळे त्यांनी रिक्त पदांची यादी जोडली आहे. याआधी पबजी गेमच्या निर्मात्यांनी सांगितले होते की, पबजी मोबाइल इंडिया सुरु करण्यासाठी त्यांची सरकारशी चर्चा सुरू आहे आणि लवकरच या दिशेने स्पष्ट निर्णय अपेक्षित आहे. भारतात पबजी खेळाचे लाखो चाहते आहेत व पुन्हा हा गेम भारतामध्ये सुरु होण्याची वाट पाहत आहेत. मात्र भारत सरकारने अजून यासाठी हिरवा कंदील दाखवला नाही. काही महिन्यांपूर्वी भारत सरकारच्या संबंधित मंत्रालयाने आरटीआयला उत्तर देताना म्हटले होते की, सरकारने पबजी मोबाइल इंडिया पुन्हा सुरू करण्याबाबत कोणतीही सवलत दिली नाही. (हेही वाचा: Twitter मध्ये लवकरचं येत आहे नवीन फिचर; आता ट्विटमध्येचं पाहू शकता YouTube व्हिडिओ)

यामध्ये आता पबजीचे निर्माते आणि भारतीय टीम हा गेम पुन्हा सुरु करण्याच्या तयारीमध्ये आहेत. पबजी इंडियाच्या टीममध्ये नवीन लोकांच्या समावेशासाठी देण्यात आलेल्या जॉब लिस्टिंगमुळे, पबजी लॉन्चिंगविषयी कदाचित चांगली बातमी येईल अशी आशा निर्माण झाली आहे. दरम्यान, गेल्या वर्षी भारत सरकारने डेटा गोपनीयता आणि सार्वभौमत्वाचा हवाला देऊन पबजी आणि TikTok सारख्या लोकप्रिय मोबाइल अ‍ॅप्ससह 200 हून अधिक चिनी अॅप्सवर बंदी घातली होती.