Paytm Credit Card: पेटीएम लवकरच सादर करेल आपले क्रेडिट कार्ड; जाणून घ्या मिळणाऱ्या सुविधा आणि ऑफर्स बद्दल
Paytm (Photo Credits: IANS)

डिजिटल वित्तीय सेवा प्लॅटफॉर्म पेटीएमने (Paytm) सोमवारी सांगितले की, ते 'नेक्स्ट जनरेशन क्रेडिट कार्ड्स' (Next Generation Credit Cards) तयार करीत आहेत. या योजनेद्वारे पेटीएमची इच्छा आहे की, या देशात मोठ्या प्रमाणात लोकांची स्वतःची क्रेडिट कार्ड्स असावीत. तसेच डिजिटल अर्थव्यवस्थेच्या वातावरणात नवीन क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना जोडण्यास मदत मिळेल. देशाच्या क्रेडिट कार्ड बाजारासाठी हा एक मोठा बदल असल्याचे सिद्ध होऊ शकते. पेटीएमने पुढील 12 ते 18 महिन्यांत सुमारे 20 लाख क्रेडिट कार्ड देण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.

भारताच्या क्रेडिट कार्ड बाजाराच्या किमान 10% बाजारपेठ ताब्यात घेण्याची कंपनीची योजना आहे, जी सध्या 3% आहे. पेटीएम त्यांच्या अॅपवर एक अभिनव डिजिटल अनुभव डिझाइन करीत आहे, जेणेकरुन वापरकर्ते त्यांचे एकूण खर्च व्यवस्थापित करू शकतील. वापरकर्त्यांचे कार्डवर पूर्ण नियंत्रण देखील असेल. यासाठी पेटीएम कार्ड जारी करणार्‍या कंपन्यांशी भागीदारी करेल. पेटीएमच्या नेक्स्ट जेनरेशन क्रेडिट कार्डमध्ये झटपट वन-टच सुविधा असतील. याद्वारे, वापरकर्ते सिक्योरिटी पिन नंबर बदलने, पत्ता अपडेट करणे, कार्ड ब्लॉक करणे, डुप्लिकेट कार्ड जारी करणे आणि थकित क्रेडिट मर्यादा स्वतःच शोधणे अशा गोष्टी करू शकतील.

या कार्डमध्ये संपर्कहीन व्यवहारासाठी कार्ड चालू किंवा बंद करण्याची सुविधा देखील असेल. वापरकर्त्यांकडे त्यांच्या कार्डावरील आंतरराष्ट्रीय व्यवहार बंद करण्याची सुविधा देखील असेल. फसवणूक झाल्यास वापरकर्त्यांच्या पैशाचे रक्षण करण्यासाठी पेटीएम क्रेडिट कार्डवर विम्याची सुविधादेखील उपलब्ध असेल. ही सेवा वापरकर्त्यांद्वारे पेटीएम क्रेडिट कार्ड खर्चाशी जोडली जाईल.

(हेही वाचा: आपल्या सोशल मिडिया अकाउंटला सुरक्षित ठेवण्यासाठी 'या' ७ टिप्स चा वापर करा)

पेटीएम क्रेडिट कार्ड वापरण्यापासून ते देण्याच्या अंमलबजावणीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया अॅपच्या माध्यमातून जाणून घेता येते. वापरकर्ते अ‍ॅपद्वारेच कार्ड किंवा कागदजत्र जमा करण्यासाठी योग्य वेळ निवडू शकतात. पेटीएम क्रेडिट कार्डच्या माध्यमातून प्रत्येक व्यवहारावर एक रिवॉर्ड प्रोग्राम देखील आहे, ज्यामध्ये निश्चित कॅशबॅक उपलब्ध असेल. जमा झालेल्या रिवॉर्ड पॉइंट्सची कोणतीही समाप्ती तारीख नसेल, वापरकर्ते पेटीएम इकोसिस्टममध्ये कधीही याचा वापर करू शक्ती.