प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Twitter)

सण समारंभ (Festivals), उत्सव या दरम्यान ऑनलाईन शॉपिंग (Online Shopping Sites) साइट्स कायमच भन्नाट ऑफर (Offer) घेवून येतात. नुकताच स्वातंत्र्यदिनाचा (Independence Day Sale) सेल होवून गेला. आता पुढे गणेशोत्सव (Ganeshotsav), दिवाळी (Diwali), दसरा (Dushehara) या दरम्यान देखील विविध ऑनलाईल सेल (Online Sale) असणार आहे. बरीच लोक हा सेल दरम्यान मोठ मोठी शॉपिंग  करताना पण दिसतात. पण सेल दरम्यान शॉपिंग  करताना हे सगळे प्रॉडक्ट्स (Products) स्वस्त पडतात की महाग हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. कारण बरेचदा सेलची जाहीरात बघूण अनेकांना भुरळ पडते पण या सेलच्या मागे नेमकं दडलयं का हे महत्वाचं. किंवा तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूवर तुम्हाला फायदा (Profit) झाला की तोटा (Loss) याबाबत काही विशेष टीप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

 

ऑनलाईन शोपिंग साइट्सवर (Online Shopping Sites) 80 टक्के ऑफर अशी जाहिरात (Advertisement) तुम्ही अनेकदा वाचली असेल. पण ही एवढी मोठी ऑफर (Offer) देणं यांना परवडत कसं तर ऑफर दिल्यास एका ग्राहकांएवजी 100 अधिक ग्राहक ती वस्तू करतात आणि ठोक किंमत बघता त्यावर ऑनलाईन शोपिंग साइट्सला नफा (Online shopping Sites Profit) होतो. एवढचं नाही तर तुम्ही कुठ्ल्याही साईटवर भेट दिल्यास त्याचा फायदा त्यांना होत असतो. तसेच वस्तूवर लिहलेलं ऑफर आकर्षित करणारी असते आणि ती वस्तू आपण लगेच खरेदी करतो पण त्यापूर्वी त्यावर नमूद केलेल्या टर्मस आणि कंडिशन्स (Terms and Conditions) वाचणं अत्यंत महत्वाचं. कारण बरेचदा त्यानुसार वस्तूची किंमत ठरवल्या जाते. (हे ही वाचा:- WhatsApp Feature Update: भारतातील युजर्ससाठी व्हॉट्सॲपचे नवे फीचर, आता चॅटींग करतानाही ऐकता येणार 'वॉयस मेसेज')

 

कुठलीही वस्तू ऑनलाईन खरेदी (Online Shopping) करण्यापूर्वी त्या वस्तूच्या अधिकृत ब्राण्डच्या वेबसाईटवर (Website) जावून वस्तूची खरी किंमत पडताळून बघावी. बरेचदा सेलमध्ये ओरिजनल (Original) किमतीपेक्षा अधिक दर दाखवत त्या दरावर ऑफर दिली जाते. ऑनलाईन शॉपिंग हा दिसायला सोपी आणि सोयीस्कर पर्याय वाटत असला तरी याबाबत संपूर्ण सविस्तर माहितीसह ऑनलाईन शॉपिंग करावी.