सध्या डिजिटलच्या युगात ऑनलाईन पद्धतीनेच बहुतांश गोष्टी खरेदी केल्या जातात. तर ऑनलाईन पद्धतीने खरेदी केल्यास दहा ठिकाणी फिरण्याचा वेळ वाचचो. मात्र ऑनलाईन ऑर्डर केलेली वस्तू प्रत्येकवेळी चांगलीच असेल असे नाही. काही वेळेस ऑर्डर केलेले डिलिव्हरी प्रोडक्ट खराब असण्याची शक्यता असते. अशा वेळी ग्राहकाने प्रथम हे काम करा.
ऑनलाईन कंपनीकडून ग्राहकाला खराब किंवा अन्य प्रोडक्ट मिळाल्यास तर तुम्ही कायद्याचा आधार घेत तुम्ही प्रोडक्डसाठी दिलेले पैसे परत मिळवू शकता. त्यासाठी भारतीय संसदने 1984 मध्ये कंज्युमर प्रोटेक्शन अॅक्ट बनवण्यात आला आहे. या कायद्याअंतर्गत ग्राहकाने खरेदी केलेले सामान उत्तम प्रतीचे असणे बंधनकारक आहे. त्याचसोबत प्रोडक्डमध्ये कोणतीही गडबड असल्यास ते दुरुस्त किंवा बदलून देणे हे अनिवार्य आहे.(या 8 गोष्टी पाहिल्याशिवाय ऑनलाईन स्मार्टफोन विकत घेऊ नकाच !)
जर खराब प्रोडक्ट बदलून न दिल्यास ग्राहकाला कंज्युमर फोरममध्ये तक्रार करु शकता. तसेच 20 लाख रुपयापर्यंतची गोष्ट असल्यास ग्राहक जिल्हा कंज्युमर फोरम मध्ये तक्रार करु शकतात. त्याचसोबत 20 लाख किंमतीपेक्षा जास्त महागडी वस्तू असल्यास ती उत्तम दर्जाची नसल्यास त्याची तक्रार तुम्ही राज्य कंज्युमर फोरम येथे करु शकतात.